LIC IPO : LIC शुक्रवारी 11 फेब्रुवारी 2022 रोजी बोर्डाच्या बैठकीत त्यांच्या पॉलिसीधारकांना LIC IPO मध्ये सूट देण्याच्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब करण्याची शक्यता आहे. एलआयसी बोर्डाच्या बैठकीत या मुद्द्यावर चर्चा होऊ शकते. सवलती व्यतिरिक्त, IPO मध्ये पॉलिसीधारकांसाठी किती राखीव ठेवायची यावर निर्णय घेतला जाऊ शकतो. असं म्हटलं जात आहे की, एलआयसी आयपीओमध्ये पॉलिसीधारकांना अर्ज केल्यावर, त्यांच्यासाठी 5 टक्के सूट देऊन 10 टक्के आयपीओ राखून ठेवला जाण्याची शक्यता आहे.


IPO अर्जावर सवलत :


LIC त्यांच्या पॉलिसीधारकांना IPO साठी अर्ज करणार्‍यांना सूट देऊ शकते. LIC पॉलिसीधारकांना LIC IPO मध्ये 5 टक्के सूट मिळू शकते. खरं तर, भारतीय शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठ्या LIC IPO मध्ये, विमाधारकांसाठी राखीव कोटा देखील ठेवला जाणार आहे. LIC IPO केवळ पॉलिसीधारकांनाच नाही तर सामान्य गुंतवणूकदार आणि LIC कर्मचाऱ्यांनाही सूट मिळेल. ही सूट शेअरच्या वरच्या पट्टीवर म्हणजेच शेअरच्या किमतीवर ठरवली जाईल. 


या आधी 10 फेब्रुवारीला (गुरुवारी) , विमा क्षेत्राचे नियामक, भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (IRDAI) ने LIC India ला IPO आणण्यासाठी मंजुरी दिली आहे. आता असं म्हटलं जात आहे की, LIC शेअर बाजार नियामक सेबीकडे ड्राफ्ट पेपर (DRHP) दाखल करणार आहे. 


LIC भारताच्या शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठा IPO घेऊन येणार आहे. LIC IPO च्या माध्यमातून बाजारातून 70,000 कोटी रुपये उभे करू शकते. स्टॉक एक्स्चेंजवर सूचीबद्ध झाल्यानंतर एलआयसीचे बाजार भांडवल 13 ते 15 लाख कोटी रुपये होण्याची शक्यता आहे. 


महत्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha