Gurugram Apartment Accident: हरियाणाच्या  गुरुग्राम (Gurugram) मध्ये गुरुवारी रात्रीच्या वेळी एका बहुमजली इमारतीचा (multi-storey residential building) एक भाग कोसळला. या दुर्घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला आहे. आणखी दोघेजण यात अडकल्याची माहिती मिळाली आहे. ही घटना गुरुग्रामच्या सेक्टर 109मध्ये घडली. 


माहितीनुसार किन्टेल्स पॅराडिसो हाउसिंग कॉम्प्लेक्सच्या सहाव्या मजल्याचं छत कोसळलं. यानंतर खालचे छत कोसळत गेले. अधिकाऱ्यांनी सांगितलं की,  NDRF आणि SDRF घटनेची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी पोहोचलं. त्यानंतर त्यांनी लगेच मदतकार्य सुरु केलं. या घटनेनंतर घटनास्थळी लोकांची मोठी गर्दी झाली आहे.  


अधिकारिऱ्यांनी सांगितलं की, एलिवेटेड प्लॅटफॉर्मसह अर्थ मूव्हिंग म्हणजे ढिगारा काढणारी मशीन तसेच अग्निशामक दलाची वाहनं घटनास्थळी पोहोचली. उपायुक्त निशांत यादव यांनी म्हटलं आहे की, या दुर्घटनेत एका व्यक्तिचा मृत्यू झाला आहे. तर ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे. 


घटना अत्यंत दुर्दैवी, मुख्यमंत्री खट्टर यांचं ट्वीट 
घटनेची माहिती मिळताच हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर (Manohar Lal Khattar) यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे की,  गुरुग्राममधील  किन्टेल्स पॅराडिसो हाउसिंग कॉम्प्लेक्स (Paradiso Housing Complex) मधील घडलेली ही घटना अत्यंत दुर्देवी आहे. घटनेची माहिती कळताच NDRF आणि SDRF सह स्थानिक प्रशासन मदतकार्याला लागले आहे. मी स्वत: वैयक्तिक या घटनेवर लक्ष ठेवून आहे. या दुर्घटनेत जखमींच्या सुरक्षेसाठी प्रार्थना करतो, असं खट्टर यांनी म्हटलं आहे.  






स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे की,   किन्टेल्स पॅराडिसो हाउसिंग कॉम्प्लेक्समधील डी टॉवरचा एक भाग कोसळला आहे. हा टॉवर 2018मध्ये बांधला आहे. या परिसरात तीन टॉवर आहेत. डी टॉवर हा 18 मजल्यांचा आहे ज्यात  चार बेडरूम असलेले अपार्टमेंट आहेत.  
 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha