Share Market Updates : मागील तीन दिवस तेजीत असलेल्या शेअर बाजाराला आज ब्रेक लागला. या आठवड्यात व्यवहाराच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजाराज्या व्यवहाराची घसरणीसह सुरूवात झाली. सेन्सेक्समध्ये 478 अंकानी घसरून 58443 आणि निफ्टी 143  अंकाच्या घसरणीसह 17462 अंकावर सुरू झाला. बाजारातील व्यवहार सुरू झाल्यानंतरही ही घसरण सुरूच राहिली. आज दिवसभर बाजार अस्थिर राहण्याची शक्यता आहे. 


शेअर बाजारातील या घसरणीचा फटका सगळ्याच क्षेत्रांना मोठ्या प्रमाणावर बसला. बँकिंग, आयटी, ऑटो, रिअल इस्टेट, एफएमसीजी, फार्मासह मिडकॅप आणि स्मॉल कॅपमधील स्टॉक्समध्ये घसरण दिसून आली. सकाळी 9.52 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्समध्ये 822.92 अंकांनी घसरला होता. सेन्सेक्स 58,110 अंकांवर व्यवहार करत होता. तर, निफ्टीमध्ये 249.25 अंकांची घसरण झाली. निफ्टी 17,350.85 अंकावर ट्रे़ड करत होता. 


 





घसरण झालेले शेअर्स


एशियन पेंट्स,  मारुती, बजाज फिनसर्व्ह, एअरटेल, सन फार्मा, रिलायन्स, आयसीआयसीआय बँक, बजाज फायनान्स, पॉवर ग्रिड, इन्फोसिस, एचडीएफसी, एचडीएफसी बँक, अॅक्सिस बँक, एसबीआय, टेक महिंद्रा, लार्सन, कोटक महिंद्रा आदी कंपन्यांचे शेअर्स घसरले आहेत. 


वधारणारे शेअर्स 


एनटीपीसी, टाटा स्टील, बीपीसीएल, इंडियन ऑइल, ओएनजीसी, हिंदाल्को यांचे शेअर्स वधारले आहेत. 


गुरुवारी बाजार वधारला


गुरुवारी शेअर बाजार बंद होताना वधारला होता. जवळपास सर्वच क्षेत्राच्या शेअर्समध्ये वाढ झाल्याचं दिसून आले.  BSE मिडकॅप  आणि स्मॉलकॅपमध्येही वाढ झाली आहे.  शेअर मार्केट बंद होताना सेन्सेक्स 460 अंकांनी वधारला आहे तर निफ्टीही 142 अंकानी वधारला होता. 


इतर महत्त्वाच्या बातम्या:



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha