LIC Investment In Adani Group : भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात एलआयसीनं (Life Insurance Corporation) अदानी समूहाला (Adani Garoup) मोठा धक्का दिला आहे. अदानी समूहात आता नवी गुंतवणूक न करण्याचा निर्णय एलआयसीनं (LIC) घेतला आहे. अदानी समूहाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे एलआयसीनं हा निर्णय घेतल्याची माहिती मिळत आहे. हिंडनबर्गच्या अहवालानंतर, अदानी समूहाला मोठे आर्थिक धक्के बसत असून, एलआयसीच्या या निर्णयामुळे अदानी समूहाचे शेअर्स आणखी घसरू शकतात, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. हिंडनबर्गच्या अहवालानंतर (Hindenburg Research) अदानी समुहाला मोठा हादरा बसला आहे. अशातच आता एलआयसीनं अदानी समुहातील घेतलेल्या निर्णयामुळे चर्चांना सुरुवात झाली आहे. 


अदानी समूहातील गुंतवणुकीवरून वाद


अदानी समुहाच्या समभागांमध्ये गुंतवणूक करणं एलआयसीला खूप महागात पडलं आहे. अदानी समुहात गुंतवणूक केल्यामुळे एलआयसीला अनेक वाद-विवादांचा सामना करावा लागत आहे. यापूर्वी अशी चर्चा होती की, एलआयसीचे उच्च व्यवस्थापन अदानी समुहाशी चर्चा करणार आहे. त्याचवेळी हिंडेनबर्गचे आरोप आणि त्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत आपल्या बचावात निर्णय घेणं LIC ला अत्यंत गरजेचं होतं. तसेच, एलआयसीमधील गुंतवणूकदारांचे पैसेही अडकले आहेत. त्यामुळे अदानी समुहातील आधीची गुंतवणूक आहे तशीच ठेवत, नवी गुंतवणूक न करण्याचा निर्णय एलआयसीनं घेतला आहे. 


बाहेर पडणं आवश्यक


CNBC-TV18 या वृत्तवाहिनीवरून एलआयसीचे अध्यक्ष एम.आर. कुमार (M R Kumar Chairman LIC) यांनी ही माहिती दिली आहे. ते म्हणाले की, आम्ही काहीही करण्याचा विचार करत नाही. अल्पावधीतच शेअर्समध्ये मोठी घसरण झाल्याचे LIC नं स्पष्ट केलं आहे. अशा स्थितीत त्यांनी अदानी समूहातील गुंतवणूक विकायची किंवा त्यासंबंधित कोणतेही पाऊल उचलायचे, असा निर्णय घेणं योग्य नाही. तसेच ते म्हणाले, 'मला निर्णय घ्यायचाय की, नाही? हे ठरवण्यासाठीच माझ्याकडे खूप कमी वेळ होता.'


अदानी समुहात LIC ची गुंतवणूक 


सरकारनं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, एलआयसीनं गेल्या अनेक वर्षांत अदानी समूहाच्या कंपन्यांमध्ये एकूण 30,127 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. या संदर्भात अध्यक्ष एमआर कुमार यांनी विश्वास व्यक्त केला आहे की, अदानी समूहाच्या शेअर्सची घसरण आणि बाजारातील खराब कामगिरीचा एलआयसीच्या एम्बेडेड मूल्यावर कोणताही नकारात्मक परिणाम होणार नाही. या गुंतवणुकीवर सकारात्मक परतावा मिळाला आहे.


एफपीओ मागे घ्यावा लागला


गेल्या 2 आठवड्यात, हिंडनबर्ग रिसर्च या अमेरिकन शॉर्ट-सेलर फर्मच्या अहवालानंतर, अदानी समूहाच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे. यामुळे अदानी समूह आणि शॉर्ट सेलर यांच्यात कायदेशीर लढाई सुरू झाली आहे. अदानी समूहाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे. यामुळे अदानी समूहाला पूर्ण सदस्यत्व असूनही एफपीओ काढून घ्यावा लागला.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Hindenburg From Adani Group : हिंडनबर्गचा अहवाल म्हणजे भारतावर हल्ला; आरोपांनंतर अदानींकडून तब्बल 413 पानांचं उत्तर