LIC Housing Finance: LIC हाउसिंग फायनान्सला (LIC Housing Finance) चालू आर्थिक वर्षात 5000 कोटी रुपयांच्या नफ्याची अपेक्षा आहे. एका वर्षात 80 टक्के परतावा दिला आहे.  FY23 मध्ये कंपनीचा निव्वळ नफा हा 2891 कोटी रुपये होता. एलआयसी हाऊसिंग फायनान्सचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) त्रिभुवन अधिकारी यांनी ही माहिती दिली.  नॉन-कोअर व्यवसायांमध्ये मालमत्तेवर कर्ज (एलएपी) आणि परवडणारी गृह कर्जे यांचा समावेश होतो. या शेअरची किंमत 641 रुपये आहे. एका वर्षात 80 टक्के मजबूत परतावा दिला असल्याचे ते म्हणाले. 


FY23 मध्ये 2891 कोटी रुपयांचा निव्वळ नफा


सर्वात मोठ्या गृहनिर्माण वित्त कंपनीचा निव्वळ नफा गेल्या आर्थिक वर्षात (2022-23) 2,891 कोटी होता. दुसऱ्या आणि तिसऱ्या श्रेणीच्या बाजारपेठेत परवडणाऱ्या घरांचा विभाग मजबूत राहिला. आम्ही या विभागावर लक्ष केंद्रित केले कारण ते लाखो इच्छुक भारतीयांना घर घेण्याची संधी देते. डिजिटल परिवर्तनाद्वारे सेवा मानकांमध्ये सुधारणा करण्याचा आमचा प्रयत्न असल्याची माहिती एलआयसी हाऊसिंग फायनान्सचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) त्रिभुवन यांनी दिली.  


कंपनीने तीन तिमाहींमध्ये कमवला 3675 कोटी रुपयांचा निव्वळ नफा


सध्याच्या ट्रेंडनुसार, चौथी तिमाही हा सहसा कंपनीसाठी सर्वात महत्त्वाचा व्यवसाय कालावधी असतो. चालू आर्थिक वर्ष चांगल्या आकडेवारीसह संपेल अशी अपेक्षा असल्याचे एलआयसी हाऊसिंग फायनान्सचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) त्रिभुवन म्हणाले. कंपनीने तीन तिमाहींमध्ये 3,675 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे. या आर्थिक वर्षाच्या अखेरीस तो 5,000 कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. कंपनीचे निव्वळ व्याज मार्जिन (NIM) डिसेंबर 2023 च्या तिमाहीत तीन टक्के होते, तर गेल्या आर्थिक वर्षाच्या त्याच तिमाहीत ते 2.41 टक्के होते.



भारतीय आयुर्विमा महामंडळ (Life Insurance Corporation of India) ही भारत देशातील सर्वात मोठी विमा कंपनी आहे. या कंपनीला एलआयसी असेही म्हटले जाते. 1818 मध्ये भारतामध्ये ओरिएंटल लाइफ इन्शुरन्स कंपनी या पहिल्या विमा कंपनीची सुरुवात झाली. गेल्या काही दिवसांत एलआयसीने शेअर (LIC Shares) बाजारातही चांगलीच कमाई केली आहे.शेअर्सच्या किंमतीत साडेसात टक्क्यांहून अधिक सुधारणा झाली आहे. गेल्या एका महिन्यानुसार, स्टॉक 17 टक्क्यांहून अधिक नफ्यात आहे.





 




महत्वाच्या बातम्या:


LIC नं मुलांसाठी सुरु केली 'अमृतबाल' योजना, नेमके काय आहेत फायदे? सविस्तर माहिती एका क्लिकवर