मुंबईसागर बंगला हा सरकारी आहे, कोणीही सरकारी कामाने सागर बंगल्यावर येऊ शकतं. कोणाचीही अडवणूक नाही. मात्र, कोणत्य निराशेतून ते बोलत आहेत, कोणती सहानुभूती हवे आहे ते माहीत नाही. ते जे बोलले ते बिनबुडाचे आहे, धादांत खोटं आहे हे त्यांना सुद्धा माहिती असल्याची टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. ते म्हणाले की,  मी मराठा समाजासाठी काय केलं? सारथी, अण्णासाहेब पाटील मंडळाची सुरुवात केली. मराठा आरक्षण हायकोर्टात आणि सर्वोच्च न्यायालयात सुध्दा टिकवलं. त्यामुळे कोणी बोलला म्हणून मराठा समाज विश्वास ठेवेल असं म्हणणारा मी नाही. जी स्क्रिप्ट आतापर्यंत उद्धव ठाकरे, पवार साहेब बोलत होते तीच स्क्रिप्ट ते जरांगे का बोलत आहेत? हा प्रश्न आहे. काही अंदाज आम्हाला आहे. आम्ही योग्यवेळी बाहेर काढू. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासन लागेल ते सर्व करेल, असे फडणवीस म्हणाले. 

Continues below advertisement

आरक्षण देऊन मुख्यमंत्र्यांनी शब्द पाळला : देवेंद्र फडणवीस 

दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण देऊन शब्द मुख्यमंत्र्यांनी पाळला असल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. प्रत्येक ठिकाणी मदत करण्याचे धोरण सरकारने घेतलं आहे. राज्यात गुंतवणूक देखील येत असल्याचे ते म्हणाले. फडणवीस यांनी विरोधकांकडून पत्रकार परिषद घेतली गेली नसल्याने टीका केली.  

जरांगे यांनी वेळोवेळी मागण्या बदलल्या

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, जरांगे पाटील  प्रामाणिक भावना मनात ठेवून या लढ्यात उतरले आहेत अशी आमची पूर्ण भावना होती. मग शिंदे कमिटी केली, त्यानंतर सरसकटची मागणी आली. यानंतर राज्यात व्याप्ती वाढवली. नंतर सगेसोयरे मागणी आली. आता ओबीसी मधून द्या म्हणाल्याने वेळोवेळी मागण्या बदलल्या. मी स्वतः मुख्यमंत्री म्हणून भेटायला गेलो. देवेंद्रजी मुख्यमंत्री होते तेव्हा 56 आंदोलन झाली. कोणालाही तेव्हा त्रास झाला नाही. यावेळी मात्र दगडफेक, आग लागली. गालबोट लावण्याचं काम कोण करत आहे, तरुणांनी सावध राहिलं पाहिजे. 

Continues below advertisement

त्यांनी सांगितले की, जोपर्यंत मनोज जरांगे पाटील यांची लोकांसाठी भावना होती तेव्हा मी स्वतः त्यांच्या बरोबर होतो. आता मात्र त्यांची भाषा राजकीय वाटत आहे. त्याच्या बोलण्यातून राजकीय वास येत आहे. आज मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याबद्दल असं बोलणं ही आपली संस्कृती नाही. हे त्यांना कोणी बोलायला लावतं का? हे पाहावं लागेल. महाराष्ट्र हे सहन करत नाही. 

इतर महत्वाच्या बातम्या