Starbucks New CEO : भारतीयांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. अमेरिकेची प्रसिद्ध कॉफी ब्रँड कंपनी स्टाबक्सने (Starbucks) सीईओ (CEO) म्हणजेच मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून भारतीय वंशाचे लक्ष्मण नरसिम्हन (Laxman Narasimhan) यांची निवड केली आहे. लक्ष्मण नरसिम्हन आता सीईओ हॉवर्ड शुल्त्स (Howard Schultz) यांच्या जागी कार्यरत होतील. भारतीय लक्ष्मण हे मूळचे पुण्याचे आहेत. जगभरातील दिग्गज कंपन्यांनी सीईओ भारतीय वंशाचे आहेत. आता लक्ष्मण नरसिम्हन यांच्या निवडीमुळे भारताची मान आणखी उंचावली आहे.


लवकरच पदावर कार्यरत होतील


लक्ष्मण नरसिम्हन लवकरच सीईओ पदाची जबाबदारी सांभाळतील. ऑक्टोबर महिन्यामध्ये लक्ष्मण नरसिम्हन कार्यभार स्विकारण्याची शक्यता आहे. दरम्यान, स्टारबक्स कंपनीने सध्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) हॉवर्ड शुल्त्स यांना हंगामी मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची जबाबदारी घेण्यास सांगितलं आहे. हॉवर्ड शुल्त्स नरसिम्हन यांच्या मदतीसाठी एप्रिल 2023 पर्यंत हंगामी सीईओची जबाबदारी पार पाडण्याची शक्यता आहे.




द वॉल स्ट्रीट जनरलच्या रिपोर्टनुसार स्टारबक्स बोर्डाचे अध्यक्ष मेलोडी हॉब्सन यांनी म्हटलं आहे की, 'स्टारबक्स कंपनीला लक्ष्मण नरसिम्हन यांच्या स्वरुपात एक असाधारण व्यक्तीमत्व मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून लाभले आहेत. त्यांनी या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे.'


लक्ष्मण नरसिम्हन मूळचे पुण्याचे



  • लक्ष्मण नरसिम्हन यांचा जन्म 15 एप्रिल रोजी पुण्यात झाला 1967 झाला.

  • त्यांचे शिक्षण पुण्यात झालं. ते सध्या 55 वर्षांचे आहेत.

  • त्यांनी पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापिठातून मेकॅनिकल इंजिनीअरींगचं शिक्षण पूर्ण केलं.

  • पेनसिल्व्हेनिया विद्यापिठातून पुढील शिक्षण घेतलं.

  • पेनसिल्व्हेनिया विद्यापीठातील लॉडर इन्स्टिट्यूटमधून त्यांनी जर्मन आणि आंतरराष्ट्रीय अभ्यासात पदव्युत्तर पदवी घेतली आहे.

  • पेनसिल्व्हेनिया विद्यापीठाच्या व्हार्टन स्कूलमधून त्यांनी व्यवसाय प्रशासनात पदव्युत्तर पदवी देखील घेतली आहे.


लक्ष्मण नरसिम्हन यांनी आतापर्यंतची कामगिरी


नरसिंहन हे अगदी अलीकडे रेकिट कंपनीचे (Reckitt) सीईओ होते. रेकिट ब्रिटनमधील ग्राहक, आरोग्य, स्वच्छता आणि न्यूट्रिशन कंपनी आहे. रेकिट कंपनीने गुरुवारी अचानक यांच्या राजीनाम्याची घोषणा केली होती. या घोषणेनंतर रेकिटचे शेअर्स पाच टक्क्यांनी घसरले होते.