Lalbaugcha Raja Donation : देशभरात धुमधडाक्यात गणेशोत्सवाला (Ganeshotsav) सुरुवात झाली आहे. सर्वत्र उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. या गणेशोत्सवाच्या काळात लोक मोठ्या प्रमाणात गणरायाच्या दानपेटीत दान अर्पण करतात. काल पहिल्या दिवशी लालबागच्या राजाला गणेशभक्तांनी अर्पण केलेल्या दानाची (Lalbaugcha Raja Donation) आजपासून मोजदाद सुरु झाली आहे. सर्व प्रथम लालबागच्या राजाला गणेशभक्तांनी दान केलेल्या रोख रुपयांची मोजदात केली जाणार आहे. त्यानंतर लालबागच्या राजाला गणेशभक्तांनी सोने आणि चांदीचे दागिणे अर्पण केले आहे त्यांची मोजदात केली जाणार आहे.
लालबागच्या राजाला अर्पण केलेल्या या दान स्वरुपी नीधीचा उपयोग लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ अनेक सामाजिक उपक्रमांत वापरत असतात. त्यामुळे गणेशभक्तांनी दान केलेल्या या नीधीचा उपयोग गणेशभक्तांच्याच अत्यावश्यक सेवेसाठी वापरला जात आहे. दरम्यान, महाराष्ट्र बॅंक आणि जी एस महानगर बॅंकेचे कर्मचारी मोजदात लालबागच्या राजाला दिलेल्या दानाची मोजदाद करत आहेत.
महत्वाच्या बातम्या: