Ladki Bahin Yojana News : माझी लाडकी योजनेची (Ladki Bahin Yojana) सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. राज्य सरकारची (State Govt) ही एक महत्वकांक्षी योजना आहे. या योजनेत अनेक ठिकाणी चुकीच्या गोष्टी होत आहेत. असाच एक प्रकार नांदेड (Nanded) जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील मनाठा इथं उघडकीस आला आहे. लाडक्या बहीण योजनेतील अर्जात खाडाखोड करुन महिलांचे पैसे पुरुषाच्या खात्यात वळते करुन फरार झालेला आरोपी पोलिसांना शरण आला आहे.


लाडक्या बहिण योजनेचे पैसे पुरुषांच्या खात्यात 


नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील मनाठा येथील सीएससी चालक सचिन थोरात याने महिलांच्या आधार कार्डवर खाडाखोडकरुन पुरुषाचे आधार क्रमांक टाकले, तसेच अर्ज भरताना नाव महिलेचा पण आधार क्रमांक आणि बँक खाते क्रमांक पुरुषाचे दिले होते.  जवळपास त्याने तसे 33 अर्ज भरले होते. लाडक्या बहिण योजनेचे पैसे पुरुषांच्या खात्यात पडले होते. ते पैसै स्वतःच्या खात्यात वळते करुन सचिन थोरात पसार झाला होता. या प्रकरणी जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने मनाठा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान आरोपी सचिन थोरात पोलिसांना शरण आला. त्याला अटक करुन पोलिसांनी पुढील तपास सूरु केला आहे. 


नोव्हेंबर महिन्याचे पैसे ऑक्टोबर महिन्यातच जमा


मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची (Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana) सगळीकडे चर्चा आहे. ही योजना जुलै 2024 पासून चालू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला 1500 रुपयांची आर्थिक मदत केली जाते. सध्या सणासुदीचा काळा आहे. हीच बाब लक्षात घेऊन राज्य सरकारने नोव्हेंबर महिन्याचे पैसे ऑक्टोबर महिन्यात देण्याचं ठरवलं आहे. त्यानुसार आता पात्र महिलांच्या बँक खात्यात ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे 3000 रुपये येण्यास सुरूवात झाली आहे. 


महिलांना आत्तापर्यंत मिळाले 7500 रुपये


राज्यात या योजनेसाठी कोट्यवधी महिला पात्र ठरल्या आहेत. या महिलांना ऑगस्ट महिन्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे 3000 रुपये पाठवण्यात आले होते. या पहिल्या दोन हप्त्यांची रक्कम 17 ऑगस्ट आणि 31 ऑगस्टला देण्यात आली होती.  त्यानंतर सप्टेंबर महिन्यात अर्ज करणाऱ्या महिलांनाही 1500 रुपये देण्यात आले होते. सप्टेंबर महिन्यात काही महिलांच्या बँक खात्यात 4500 रुपये आले होते. ज्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्यात लाभ मिळाला नव्हता अशा महिलांना सप्टेंबर महिन्यात एकूण 4500 रुपये देण्यात आले होते. त्यानंतर आता ऑक्टोबरमध्ये महिलांना एकूण 3000 रुपये मिळाले आहेत. पात्र ठरलेल्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत एकूण 7500 रुपये मिळाले आहेत. 


महत्वाच्या बातम्या:


मोठी बातमी! लाडक्या बहिणींना पुन्हा 3000 रुपये मिळण्यास सुरुवात, बँक खाते लगेच करा चेक