Mindtree & L&T Infotech Merger Likely: जागतिक पातळीवरील दिग्गज आयटी कंपन्यांच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी भारतीय कंपनी एल अॅण्ड टी (L&T) मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. एल अॅण्ड टी इन्फोटेक आणि आणि माइंडट्री या दोन कंपन्यांचे विलीनीकरण होण्याची दाट शक्यता आहे. या दोन्ही कंपन्या एल अॅण्ड टी कंपनी समूहाचा भाग आहे. या विलीनीकरणानंतर 22 अब्ज डॉलरची एक मोठी आयटी कंपनी अस्तित्वात येण्याची शक्यता आहे. या विलीनीकरणामुळे जागतिक आयटी कंपन्यांसोबत स्पर्धा करता येणार आहे.
Mindtree आणि Larsen & Toubro Infotech यांच्या विलीनीकरणानंतर शेअर स्वॅप करण्याबाबत पुढील आठवड्यात विचार करण्यात येऊ शकतो. मात्र, त्यासाठी अद्याप तारीख निश्चित करण्यात आली नाही. त्याशिवाय शेअर बाजारालाही अद्याप कल्पना दिली नसल्याचे काही वृत्तसंस्थांनी म्हटले आहे.
एल अॅण्ड टी कंपनीने 2019 मध्ये माइंडट्री कंपनीला खरेदी केले होते. माइंडट्रीमध्ये एल अॅण्ड ट्रीचे 61 टक्के हिस्सा आहे. माइंडट्रीचे बाजार भांडवल 8.3 अब्ज डॉलर इतके आहे. तर, एल अॅण्ड टी इन्फोटेकमध्ये एल अॅण्ड टी कंपनीचा 74 टक्के हिस्सा आहे. याचे बाजार भांडवल 13.6 अब्ज डॉलर इतके आहे. सध्या दोन्ही कंपन्यांच्या विलीनीकरणाची चर्चा सुरू आहे.
सध्या देशात व्यावसायिक क्षेत्रात विलीनीकरण सुरू असल्याचे चित्र आहे. मल्टिप्लेक्स क्षेत्रातील दोन मोठ्या कंपन्या आयनॉक्स आणि पीव्हीआर यांचे विलीनीकरण होत आहे. तर, एचडीएफसी आणि एचडीएफसी बँकेचे विलीनीकरण होणार आहे. आता एल अॅण्डी टीच्या दोन आयटी कंपन्यांचे विलीनीकरण होणार आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या: