Kiger vs Magnite : कार खरेदीदारांना हॅचबॅक कारकडून (Hatchback Car) एसयूव्हीकडे (SUV) वळवण्यात सबकॉम्पॅक्ट एसयूव्ही यशस्वी ठरल्या आहेत. याचं मुख्य कारण म्हणजे किंमत आणि कार्यक्षमता आहे. Renault Kiger आणि Nissan Magnite या दोन्ही सबकॉम्पॅक्ट SUV ला 4-स्टार GNCAP सुरक्षा रेटिंग देखील मिळालं आहे. स्टाईलनुसार, यात दोन्ही कारमध्ये काहीही समान नाही. दोन्हीचे डिझाइन एकमेकांपेक्षा वेगळे आहेत. या दोघांपैकी  Kiger चे डिझाइन स्पोर्टीअर आहे. विशेषत: म्हणजे या कारची मागील भागाची रचना. Magniteला SUV चे रुळलेले डिझाईन आहे, जे Kiger ला नाही. वेगळ्या स्टाईलमुळे Kiger अधिक लक्ष वेधून घेते. त्यामुळे तुम्ही कोणती खरेदी करावी? हे जाणून घ्या


दोन्ही कारच्या आतील भागात सारखे फिचर्स आहेत. यामध्ये ती इंजिन सुरू/थांबण्याची रचना आहे. काही फिचर्सची टचस्क्रीन सारखेच आहे मात्र त्यातही मोठा फरक आहेत. Magnite आणि Kiger ची टचस्क्रीन तुलनेने वेगळी आहे. Kiger मध्ये Magnite च्या तुलनेनं डॅशबोर्ड ब्लॅक रंगासह अधिक चांगलं दिसतं. यासह चांगल्या दर्जाच्या डोर पॅडही थोडा चांगला आहे. Magnite मध्ये विशिष्ट ड्रायव्हर डिस्प्ले आहे तर काहींना Kiger वरील डिजिटल डिस्प्ले आवडू शकतो. या टॉप-एंड ट्रिम्ससह, दोन्ही सबकॉम्पॅक्ट SUV किमतीच्या तुलनेनं अधिक महाग आहेत. 


Magnite मध्ये 360 डिग्री कॅमेरा/ कनेक्टेड टेक आणि एक JBL ऑडिओ आहे तर Kiger ला Arkamys ऑडिओसह डिजिटल डायलसह कनेक्ट केले आहे. किगरमध्ये 2.5 एअर फिल्टर आहे तर मॅग्नाइटमध्ये 'ड्रायव्हिंग इको' मिळतो. सुरक्षेच्या दृष्टीने, किगरला अधिक 4 एअरबॅग मिळतात आणि त्यात अतिरिक्त फ्रंट पार्किंग सेन्सर देखील आहेत तर मॅग्नाइटमध्ये दोन एअरबॅग मिळतात. जागेच्या बाबतीत मॅग्नाइटमध्ये मागे तीन प्रवासी आरामदायी प्रवास करु शकतात. तुलनेनं किगरमध्ये योग्य जागा असताना मागील खिडक्याही लहान आहेत. किगरकडे मॅग्नाइटपेक्षा मोठा बूट आहे.


रिनॉल्ट किगर (Renault Kiger) 
क्रूझ कंट्रोल आणि वायरलेस फोन चार्जिंग यासारखे काही फीचर्स आजकाल भारतीय बाजारात ऑफर केलेल्या कारमध्ये अपडेट केल्या जात आहेत. 2022 Renault Kiger मध्येही हे फीचर्स अपडेट केले गेले आहेत. PM2.5 Advance Atmospheric Filter आजच्या कारमध्ये दिसत आहे. याशिवाय याला रेड फेड डॅशबोर्ड अॅक्सेंट आणि रेड स्टिचिंगसह एम्बॉस्ड सीट अपहोल्स्ट्री मिळते. कारमध्ये 16-इंच डायमंड-कट अलॉय व्हील्स देखील अपडेट केले आहेत. नवीन किगर टर्बो रेंजमध्ये फ्रंट स्किड प्लेट, टेल गेटवर क्रोम, टर्बो डोअर डेकल्स आणि मेटल मस्टर्डमध्ये मिस्ट्री ब्लॅक रूफसह ड्युअल टोनमध्ये एक नवीन रंग पर्याय देखील मिळतो.


निसान मॅग्नाइट (Nissan Magnite)
निसान मॅग्नाइट गाडीच्या मध्यभागी  एअर प्युरिफायर बसवण्यात आला आहे. मॅग्नाइटमध्ये टर्बो पेट्रोल युनिटसह दोन पेट्रोल इंजिन आहेत. यामध्ये नॅचरली एस्पिरेटेड इंजिन 5 स्पीड मॅन्यूअल गियरबॉक्स दिले आहे. याच्या टर्बो इंजिन मध्ये CVT चा ऑप्शन सुद्धा मिळतो. या कारच्या पॉवर आणि परफॉर्मन्स मध्ये याचे 999 सीसी, तीन सिलिंडर, नॅचरली एस्पिरेटेड इंजिन 6250 आरपीएमवर 71 बीएचपीचे मॅक्सिमम पॉवर आणि 2800 ते 3600 आरपीएमवर 96 एनएमचे पीक टॉर्क जनरेट करते.


महत्त्वाच्या इतर बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha


Car loan Information:

Calculate Car Loan EMI