Bank News : अनेक बँकांचा व्यवहार कोट्यावधींच्या घरात गेला आहे. लोकांच्या ठेवीतून अनेक बँका मोठ्या प्रमाणात नफा मिळवत आहे. नफा मिळवण्यात तीन बँका आघाडीवर आहेत. यामध्ये येस बँक, कोटक महिंद्रा बँक आणि आयडीबीआय या बँकांनी कोट्यावधींच्या घरात नफा मिळवला आहे. या तीन बँकांनी केवळ तीन महिन्यात 4 हजार 740 कोटी रुपयांचा निव्वळ नफा मिळवला आहे. 


येस बँकेला किती नफा? 


येस बँकेने दिलेल्या माहितीनुसार त्यांचा ऑपरेटिंग नफा वार्षिक आधारावर 1.4 टक्क्यांनी वाढून 801 कोटी रुपये झाला आहे. मात्र, वर्षभरापूर्वी याच काळात हा आकडा 790 कोटी रुपयांवर होता. तर, बँकेचे प्रोव्हिजन कव्हरेज रेषो सप्टेंबर तिमाहीत 56.4 टक्के नोंदवला गेला होता. जो एका वर्षापूर्वी याच कालावधीत 48.4 टक्के होता.


IDBI बँकेला किती झाला नफा?


देशातील या तीन मोठ्या बँकांनी 2023-24 या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत मिळून 4 हजार 740 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे. दोन खासगी आणि एक सार्वजनिक क्षेत्रातील बँका आहेत. जर आपण सार्वजनिक क्षेत्रातील बँक IDBI बद्दल बोललो, तर तिने आर्थिक वर्ष 2023-24 च्या दुसऱ्या तिमाहीत 1 हजार 323.3 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे. मात्र, गेल्या वर्षी याच कालावधीत आयडीबीआयने 828.1 कोटी रुपयांची कमाई केली होती. म्हणजेच गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 59.8 टक्के अधिक नफा झाला आहे.


विशेष बाब म्हणजे दुसऱ्या तिमाहीत IDBI चे एकूण उत्पन्न 6,924.2 कोटी रुपये नोंदवले गेले, जे गेल्या वर्षीच्या तुलनेत 14 टक्के अधिक आहे. 2022-23 आर्थिक वर्षात, IDBI ने याच कालावधीत एकूण 6,065.5 कोटी रुपये कमावले होते. IDBI चे हे उत्पन्न चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत नोंदवलेल्या 7,712 कोटी रुपयांच्या उत्पन्नापेक्षा 10 टक्के कमी आहे.


कोटक महिंद्रा बँकेच्या निव्वळ नफ्यात 23.6 टक्क्यांची वाढ 


खासगी क्षेत्रातील बँक कोटक महिंद्राने शनिवारी आर्थिक वर्ष 2023-24 च्या दुसऱ्या तिमाहीचा अहवाल प्रसिद्ध केला. या अहवालात बँकेने निव्वळ नफ्यात 23.6 टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. याचा अर्थ कोटक महिंद्राने आर्थिक वर्ष 2023-24 च्या दुसऱ्या तिमाहीत 3 हजार 191 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे. तथापि, दुसऱ्या तिमाहीत 3,124.2 कोटी रुपयांचा नफा कमावण्याचा पूर्वी अंदाज होता, जो चुकीचा ठरला. यासह, कोटक महिंद्रा बँकेचे निव्वळ व्याज उत्पन्न वार्षिक आधारावर 23.5 टक्के वाढून 6,297 कोटी रुपये झाले आहे. विशेष बाब म्हणजे सप्टेंबर तिमाहीत त्याचे निव्वळ व्याज मार्जिन 5.22 टक्के नोंदवले गेले आहे. त्याचवेळी, बँकेचे म्हणणे आहे की जुलै-सप्टेंबर तिमाहीत त्यांचे एकूण उत्पन्न 13 हजार 507 कोटी रुपये होते, जे एका वर्षापूर्वी 9 हजार 925 कोटी रुपये होते.


चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत येस बँकेने बंपर नफा कमावला आहे. दुसऱ्या तिमाहीत येस बँकेचा निव्वळ नफा 47.4 टक्क्यांनी वाढून 225.21 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. मात्र, गेल्या वर्षी याच कालावधीत बँकेचा निव्वळ नफा 152.82 कोटी रुपये होता. तर ऑपरेशन्समधील एकूण उत्पन्न वार्षिक आधारावर 25 टक्के वाढून 7 हजार 921 कोटी रुपये झाले आहे. तर वर्षभरापूर्वी ते 6348 कोटी रुपये होते. येस बँकेच्या निव्वळ व्याज उत्पन्नात वार्षिक आधारावर 3.3 टक्क्यांची घसरण झाली आहे. जी 1925 कोटी रुपयांवर पोहोचली आहे.


महत्त्वाच्या बातम्या:


CWC 2023: विश्वचषकाचा अर्थव्यवस्थेला मोठा फायदा, 'ही' तीन क्षेत्र होणार मालामाल; 'या' माजी क्रिकेटरचा दावा