Knight Frank India Real Estate Report 2023: बांधकाम व्यवसायिकांसाठी मार्च महिना हा गेल्यावर्षीच्या तुलनेत निराशाजनक ठरला आहे. मार्च 2023 मध्ये मुंबई महापालिकेच्या हद्दीत जवळपास 12 हजार 421 नव्या घरांची नोंदणी झाली आहे. ही नोंदणी मार्च 2022 च्या तुलनेत 26 टक्क्यांनी कमी आहे. यातून राज्य सरकारला तब्बल 1,143 कोटी रूपयांचा महसूल मिळाला आहे. यामुळे मुंबईत एप्रिल महिन्यात आतापर्यंत सर्वाधिक महसूल जमा झाला आहे. रिअल इस्टेट कन्सल्टन्सी नाइट फ्रँक इंडियाने (Knight Frank India) ही आकडेवारी जाहीर केली आहे.
Knight Frank India Real Estate Report 2023: एप्रिल 2022 पासून मुंबईत सर्वाधिक घराची नोंदणी आणि महसूल गोळा झाला.
Period |
Registration |
Revenue |
Apr-22 |
11,743 |
738 |
May-22 |
9,839 |
727 |
Jun-22 |
9,919 |
734 |
Jul-22 |
11,340 |
829 |
Aug-22 |
8,552 |
644 |
Sep-22 |
8,628 |
734 |
Oct-22 |
8,422 |
724 |
Nov-22 |
8,965 |
684 |
Dec-22 |
9,367 |
835 |
Jan-23 |
9,001 |
692 |
Feb-23 |
9,684 |
1,112 |
Mar-23 |
12,421 |
1,143 |
Total |
117881 |
9596 |
Source : Knight Frank India
नाइट फ्रँक इंडियाने आपल्या आवाहलात दिलेल्या माहितीनुसार, ग्राहकांची खरेदी क्षमता वाढल्याने मुंबईतील मालमत्तेची विक्री चांगलीच राहिली आहे. मार्च 2023 मध्ये दररोज सरासरी मालमत्तेची नोंदणी 401 युनिट्स होती, ज्यामुळे मार्च 2021 नंतर गेल्या दहा वर्षांमध्ये हा तिसरा-सर्वोत्तम मार्च महिना ठरला. मुद्रांक शुल्क कपातीच्या फायद्यांमुळे मार्च 2021 मध्ये सर्वाधिक सरासरी दैनंदिन विक्री 572 युनिट्स झाली. मार्च 2022 मध्ये मेट्रोचे बांधकाम सुरु होण्यापूर्वी मालमत्तेच्या नोंदणीमध्ये झालेल्या गर्दीमुळे सरासरी दररोज 540 युनिट्सच्या विक्रीसह मालमत्ता नोंदणीमध्ये वाढ झाली. या आर्थिक वर्षातही मार्च हा मुख्यतः घर खरेदीसाठी चांगला महिना ठरला आहे.
नाइट फ्रँक इंडियाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक शिशिर बैजल यांनी दिलेल्या माहितीनुसार, “अलीकडील व्याजदरात वाढ होऊनही मार्चमध्ये मुंबई प्रॉपर्टी मार्केटची ताकद दिसून आली. मार्च 2023 मध्ये आर्थिक वर्ष 2023 मधील सर्वाधिक मालमत्तेच्या नोंदणीत वाढ झाली आहे. स्वतःच घर असावं या दृढ इच्छेमुळे मालमत्तेच्या नोंदणीत वाढ झाल्याने राज्याच्या तिजोरीत लक्षणीय नफा झाला. यामुळे मुंबई प्रॉपर्टी मार्केट आणखी मजबूत झाले आहे.''
Knight Frank India Real Estate Report 2023: 500-1000 चौरस फुटांच्या घरांना ग्राहकांची पसंती
मार्च 2023 मध्ये 500 चौरस फूट ते 1,000 चौरस फूट एवढी अपार्टमेंट्स खरेदीदारांची पसंती राहिली. जी सर्व अपार्टमेंट्सपैकी 48% होती. 500 चौ.फूट पेक्षा कमी असलेल्या अपार्टमेंट्सचा बाजार हिस्सा जानेवारी 2023 मध्ये 35% वरून मार्च 2023 मध्ये 34% वर किरकोळ घसरला. 1,000 चौ. फूट पेक्षा मोठ्या क्षेत्रासाठीचा हिस्सा फेब्रुवारी 2023 मध्ये 21% वरून घसरला आणि मार्च 2023 मध्ये 17% पर्यंत घसरला आहे.
संबंधित बातमी: