Mahatma Phule Movieमहात्मा फुले (Mahatma Phule) यांच्या जीवनावर आधारित चित्रपट बनवणाऱ्या कंपनीला अखेर राज्य सरकारचा निधी मंजूर झाला आहे. राज्य सरकारच्या वतीने या चित्रपटाची निर्मिती केली जात असून मे. एलोकेन्स प्रा. लिमिटेड या कंपनीला चित्रपटाचं कंत्राट दिलेलं होतं. पण या कंपनीने सरकारच्या  अटी आणि शर्थीचा भंग केल्यामुळे कंपनी वादग्रस्त ठरली होती. त्यामुळे या कंपनीला निधी देण्यास संबंधित अधिकाऱ्यांनी आक्षेप घेतल्यानंतर पाच वर्ष काम रखडलं होतं. मात्र सरकार बदलताच या कंपनीला 1 कोटी 10 लाख रुपयांचा पहिला हप्ता मंजूर करण्यात आलाय. करार झाल्यानंतर एका वर्षात चित्रपट तयार झाला नाही तर दररोज कंपनीला एक लाखांचा दंड करण्याची तरतुद आहे. पाच वर्षात चित्रपटाला सुरुवातही झाली नाही त्यामुळे याला जबाबदार कोण? असा प्रश्न समोर येतोय. 


कंपनीचे वादग्रस्त मुद्दे


महात्मा फुले यांच्या जीवनावर आधारित चित्रपट बनवणासाठी मे. एलोक्यन्स मीडिया प्रा. लि या कंपनीची राज्य सरकारने निवड केली. मात्र या कंपनी संदर्भात अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. महात्मा फुले यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाचा निर्मिती राज्य सरकार करणार असून चित्रपटाचे सर्व अधिकार मात्र खाजगी कंपनीकडे आहेत. या चित्रपटाची निर्मिती करण्यासाठी राज्य सरकार मे. एलोक्यन्स मीडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला 20 कोटी रुपये देणार होते. मात्र चित्रपटाचे सर्व अधिकार या खाजगी कंपनीकडे असणार आणि जर व्यावसायिक उपयोग केला तर अवघे चार कोटी रुपये ही कंपनी राज्य सरकारला देणार असा करार झाला होता.


टेंडर नंतर या कंपनीची निवड कोणत्या गुणांच्या आधारे करण्यात आली? याबद्दल कोणतीही माहिती देण्यात आली नाही. त्यामुळे  जवळच्या कंपनीला टेंडर देण्यात आल्याचा संशय निर्माण झाला. याच कंपनीशी करार केलेली फाईल गहाळ कशी झाली? असा प्रश्न निर्माण झाला. करार झाल्यानंतर एका वर्षात चित्रपट तयार झाला नाही, तर दररोज कंपनीला एक लाखांचा दंड भरावा लागणार होता. मग पाच वर्षांनंतर ही चित्रपटाच्या निर्मितीला सुरवात झाली नाही तर दंड का आकारण्यात आला नाही? असाही प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे मे. एलोक्यन्स मीडिया प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी वादाच्या भोवऱ्यात अडकली होती. 


महत्मा फुलेंच्या जीवनावर आधारित अनेक नाटक आणि चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आली. काही महिन्यांपूर्वी 'फुले' (Phule) या चित्रपटाचं पोस्टर रिलीज झालं होतं. या चित्रपटाचं कथानक महात्मा फुले यांच्या जीवनावर आधारित असणार आहे. 'फुले' चित्रपटाच्या  पोस्टरमध्ये असे दिसत होतं की चित्रपटामध्ये अभिनेता प्रतिक गांधी (Pratik Gandhi) हा महात्मा जोतीराव फुले यांची भूमिका साकारणार आहे. तर अभिनेत्री पत्रलेखा (Patralekha) ही सावित्रीबाई फुले यांची भूमिका साकारणार आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या:


Mahatma Phule : उद्योजक ते सामाजिक क्रांतीतील अग्रणी ; महात्मा फुले यांच्या या 10 गोष्टी जाणून घ्या