मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारने कोरोनामृतांची आकडेवारी लपवल्याचा आरोप केल्यानंतर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यावर भाष्य करताना आकडेवारीची नोंद होताना पुढे मागे होत असेल असं म्हणाले आहेत. शिवाय राज्यात ऑक्सिजनअभावी एकही कोरोनामृत्यू न झाल्याचं टोपे यांनी पुन्हा एकदा छातीठोकपणे सांगितलं आहे.


तसंच कोरोना काळातील मृ्त्यू राज्य सरकारने लपवल्याचे आरोप झाले असले तरी हायकोर्टाने आम्ही चांगलं काम केल्याचं नमूद केलं आहे, असं प्रतिपादन टोपेंनी केलं. शिवाय WHO ने देखील मुंबईच्या धारावीतील कामगिरीचं कौतक केल्याबद्दलही टोपे म्हणाले. दरम्यान 1 लाख 40 हजार मृत्यू झाले असले तरी 12 कोटी लोकांना तपासल्याचं तसंच लॅबची संख्या वाढवल्याचं कामही राज्य सरकारने केल्याचं टोपे म्हणाले.


ऑक्सिजनअभावी एकही मृत्यू नाही


कोरोनाकाळात ऑक्सिजनअभावी राज्यात एकही मृत्यू न झाल्याचं राजेश टोपे यावेळी म्हणाले. तसंच स्वत: पंप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील एकूण बेडपैकी 25 टक्के बेड महाराष्ट्र राज्यात असल्याचा उल्लेख केल्याचंही टोपे म्हणाले. 






संबंधित बातम्या : 







LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha