Kanchipuram silk sarees Price : दिवसेंदिवस सोन्या चांदीच्या दरात (Gold Silver Price) मोठी वाढ होत आहे. वाढत्या सोन्या चांदीच्या दराचा मोठा फटका ग्राहकांना बसत आहे. वाढत्या दरामुळं सोनं चांदी खरेदी करावं की नको असा प्रश्न निर्माण होत आहे. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार सोन्या चांदीच्या वाढत्या किमतींमुळे जगभरात ब्रोकेड वर्कसाठी प्रसिद्ध असलेल्या कांचीपुरमच्या सिल्क साड्या (Kanchipuram silk sarees) महागल्या आहेत. या साड्यांच्या किंमती 50  टक्क्यांनी वाढल्या आहेत. 


वाढत्या सोन्या चांदीचा परिणाम खरेदीदारांच्या खिशावर होत आहे. तसेच सोन्याच्या गगनाला भिडलेल्या किमतींमुळे जगभरात ब्रोकेड वर्कसाठी प्रसिद्ध असलेल्या कांचीपुरमच्या साड्या महागल्या आहेत. कांचीपुरम सिल्क साडीची किंमत गेल्या 8 महिन्यांत 50 टक्क्यांनी वाढली आहे. त्यामुळं ग्राहक कांचीपुरमच्या साड्याऐवजी इतर साड्यांची खरेदी करण्याकडे लक्ष देत आहेत.


कांचीपुरम सिल्क साड्या खरेदी करणं झालं महाग


सोन्याच्या किमतीमुळे साडीप्रेमींच्या खर्चातही वाढ झाली आहे. सध्या लग्नसराईचा हंगाम आहे. या काळात मोठ्या प्रमाणात साड्यांची खरेदी होत असते. कांचीपुरम सिल्क साड्या खरेदी करण्याचा हा पीक सीझन आहे. वर्षाची ही वेळ असते जेव्हा लोक लग्नासाठी कांचीपुरम सिल्क साड्या खरेदी करण्यासाठी कापड शोरूमला भेट देतात. पण आता या साड्यांची खरेदी करण्यासाठी खिशावर आणखी बोजा टाकावा लागणार आहे. कारण सोन्याच्या गगनाला भिडलेल्या किमतींमुळं जगप्रसिद्ध कांचीपुरमच्या साड्या महागल्या आहेत.


दर वाढल्यामुळं नाही. कांचीपुरम सिल्क साड्यांची विक्री कमी


गेल्या काही महिन्यांपासून सोन्याच्या किंमतीत सातत्याने वाढ होत आहे. गेल्या आठ महिन्यांत कांचीपुरम सिल्क साड्यांच्या किमतीत 50 टक्क्यांची वाढ झालीय. त्यामुळं सोन्या-चांदीचा कमी वापर करणाऱ्या साड्यांकडे ग्राहक वळू लागले आहेत. लोक अशा साड्या शोधत आहेत ज्यात सोने आणि चांदी नाही. कांचीपुरम सिल्क साड्यांच्या रिटेल टेक्सटाईल चेन ब्रँड RMKV च्या मते, किमती वाढल्यामुळं त्यांची विक्री 20 टक्क्यांनी कमी झाली आहे. दरम्यान, साडी विक्रेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बरेच ग्राहक विशिष्ट बजेटसह येतात आणि कमी सोने आणि चांदीच्या (कांचीपुरम) रेशमी साड्या पसंत करतात. त्याचप्रमाणे काही ग्राहक त्यांच्या बजेटनुसार साड्यांची संख्या कमी करतात. इतक्या कमी कालावधीत सिल्क साड्यांच्या किमतीत 35 टक्के ते 40 टक्के वाढ होण्याची ही पहिलीच वेळ आहे. या काळात सोन्याच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. 1 ऑक्टोबर 2023 रोजी 22 कॅरेट सोन्याची किंमत 5,356 रुपये प्रति ग्रॅम होती, जी 21 मे 2024 रोजी वाढून 6,900 रुपये प्रति ग्रॅम झाली. त्याचप्रमाणे चांदीचा भावही वाढत आहेत.


महत्वाच्या बातम्या:


चांदीचा नवा विक्रम! गाठला 95 हजारांचा टप्पा, लवकरच चांदी होणार 1 लाख रुपये?