ITR Filing Online : प्राप्तिकर भरण्याचा सीजन आता सुरू झाला आहे. ऑ नलाईन आणि आॅफलाईन पद्धतीने तुम्हाला प्राप्तिकर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यामुळे तुम्ही कधीही प्राप्तिकर भरू शकता. ऑनलाइन फाॅर्म भरण्याचे अनेक फायदे आहेत. काय आहेत फायदे. 


इमकम टॅक्स रिटर्न काय आहे. 


हा एक असा फाॅर्म आहे ज्यात तुम्हाला आयकर विभागाला सांगावे लागते की , संपूर्ण वर्षातील तुमची कमाई केवढी आहे. त्यानुसार तुम्हाला प्राप्तिकर भरावा लागतो. तुमच्या वर्षाच्या मिळकतीनुसार  तुम्हाला प्राप्तिकर भरावा लागेल.


ITR  कोणाला भरावा लागेल


प्राप्तिकर कायद्यानुसार प्रत्येक व्यक्तीला ITR  भरणे गरजेचे आहे. संपूर्ण  वर्षात जर तुमचे उत्पन्न पगारातून किंवा व्यवसाय, घराच्या मालमत्तेच्या विक्रीतून किंवा लाभांश, भांडवली नफा किंवा इतर कोणत्याही स्त्रोताच्या व्याजातून आले असेल, तर तुम्ही ITR भरले पाहिजे. तुम्ही ठराविक मर्यादेच्या वर आला असाल तर मात्र तुम्हाला ITR  भरावे लागेल. ITR भरण्याचा एक विशिष्ट कालावधी आहे. या संबंधित कालावधीत तुम्ही ITR भरले नाही तर दंड भरावा लागू शकतो. 


ITR  आॅनलाईन पद्धतीने भरण्याचे फायदे काय आहेत


ITR  आॅनलाईन पद्धतीने भरण्याच्या प्रोसेसला ई-फाइलिंग देखील म्हणले जाते. इंटरनेटच्या मदतीने तुम्ही हे ITR करू शकता. ई-फाइलिंगचे अनेक फायदे आहेत.घरात बसूनही तुम्ही हे फाॅर्म भरू शकता. कोणत्याही वेळी तुम्ही हा फाॅर्म भरता येऊ शकते. 


ITR द्वारे तुम्हाला रिफंड मिळेल


काहीवेळा असे देखील होते की उत्पन्न कराच्या कक्षेत येत नाही, परंतु तरीही तुमचा टीडीएस कापला जातो. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला परतावा हवा असेल तर आयटीआर भरणे आवश्यक आहे. टॅक्स रिफंडचा दावा करण्यासाठी आयटीआर भरावा लागतो. आयटीआर दाखल केल्यानंतर, आयकर विभाग त्याचे मूल्यांकन करते. 


डाॅक्युमेंटेशनचे व्हेरिफिकेशन करण्यासाठी मदत मिळते


ITR  तुम्हाला डाॅक्युमेंटेशनचे व्हेरिफिकेशन करण्यासाठी तुम्हाला मदत करते.हे तुम्हाला प्रुफ देण्याचे काम करते. यात तुम्हाला तुमचे संपूर्ण डीटेल्स भरावे लागतात. 


इनकमचे प्रुफ राहते


ITR हे तुमच्यासाठी इनकम प्रुफचे काम करते.यात तुमची वर्षाची कमाई याबद्दल संपूर्ण माहिती असते. इनश्युरन्स क्लेम करण्यासाठी किंवा व्हिजासाठी हे सरकारी वेरिफाईटड प्रुफ म्हणून काम करते.


व्हिजासाठी ITR आहे महत्वाचे


व्हिजासाठी जेव्हा तुम्ही अप्लाय करता त्यावेळी ITR ची आवश्यकता असते. व्हिजा आॅथोरीटी दर 3 ते  5 वर्षानंतर ITR  मागून घेते. याद्वारे तुमचे फाइनेंशियल स्टेटस चेक केले जाते. अशा वेळी ITR तुमच्या खूप कामी येते.  


 


इतर महत्वाच्या बातम्या


Nashik Income Tax : बांधकाम व्यावसायिकांनंतर आता उद्योजक रडारवर, नाशिकमध्ये आयकर विभागाची कारवाई