मुंबई : करोना महासाथीनंतर आता अनेकांना आरोग्य विम्याचे महत्त्व समजले आहे. स्वत:चा तसेच कुटंबीयांचा आरोग्य विमा काढणाऱ्यांचे प्रमाण आता लक्षणीय वाढले आहे. त्यामुळेच विमा कंपन्यांच्या कारभारावर नियंत्रण ठेवणारी तसेच आरोग्य विम्यासंदर्भात वेगवेगळे नियम करणाऱ्या विमा नियामक व प्रधाकरण मंडळाने (IRDAI) एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे आता सामान्य जनतेची आरोग्य विमाविषयक डोकेदुखी कमी होणार आहे. आता रुग्णाला डिस्चार्ज मिळाल्यानंत अवघ्या तीन तासांत विमा कंपन्यांना क्लेम सेटलमेंट करावे लागणार आहे. तसेच रुग्ण रुग्णालयात भरती झाल्यानंतर अवध्या एका तासात आरोग्य विमा सक्रिय करावा लागणार आहे. 


विमा ग्राहकांची डोकेदुखी कमी होणार


रुग्णाचा आरोग्य विमा असूनदेखील अनेकवेळा रुग्ण तसेच रुणांचे नातेवाईक परेशान असतात. रुग्णाचा उपचार आरोग्य विम्याअंतर्गत होणार की नाही? हे समजण्यासाठीच कित्येक तास लागतात. तसेच रुग्णाला डिस्चार्ज मिळाल्यानंतर क्लेम सेटलमेंटसाठीदेखील अनेक दिवस लागतात. त्यामुळे रुग्णाला तसेच त्याच्या नातेवाईकांना कारण नसताना मनस्ताप सहन करावा लागतो. IRDAI ने जारी केलेल्या नव्या आदेशानंतर मात्र आता ही डोकेदुखी कमी होणार आहे. क्लेम सेटलमेंट, तसेच पॉलिसी अॅक्टिव्हेशनसाठी आता अवघे काही तास लागणार आहेत. 


IRDAI च्या नव्या सर्क्यूलरमध्ये नेमकं काय आहे?


IRDAI ने आरोग्य विम्यासंदर्भातील नियमांत मोठे बदल केले आहेत. रुग्णालयाकडून रुग्णाच्या डिस्चार्जची रिक्वेस्ट आल्यावर विमा कंपन्यांना त्यावर अवघ्या तीन तासांत निर्णय घ्यावा लागणार आहे. विमा कंपन्यांना रुग्णाच्या डिस्चार्जवर तीन तासांच्या आत निर्णय घ्यावा लागणार आहे. म्हणजेच रुग्णाच्या डिस्चार्ज रिक्वेस्ट मिळाल्यानंतर विमा कंपन्यांना आता तीन तासांच्या आत क्लेम सेटलमेंट करावे लागणार आहे. यासह विमा कंपन्यांना रुग्णाच्या कॅशलेश उपचारासाठी एका तासाच्या आत निर्णय घ्यावा लागणार आहे. म्हणजेच रुग्णाचा आरोग्य विम्याअंतर्गत उपचार होणार की नाही, हे अवघ्या एका तासाच्या आत समजणार आहे. 


जुन्या अधिसूचना आता रद्द  


IRDAI जारी केलेल्या नव्या निर्णयानुसार आता पूर्वीचे सर्व 55 सर्क्यूलर रद्द करण्यात आले आहेत. रद्द करण्यात आलेल्या सर्व 55 सर्क्यूलरचा समावेश नव्या सर्क्यूलरमध्ये करण्यात आला आहे. आरोग्य विमा काढणाऱ्या ग्राहकांना अधिक सशक्त करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे, असे IRDAI ने स्पष्ट केले आहे. 


हेही वाचा :


घरात किती सोनं साठवता येतं? एक व्यक्ती किती सोनं खरेदी करू शकते; वाचा नियम काय सांगतो?


आरबीआयच्या निर्णयामुळे खळबळ! एडलवाईजच्या दोन मोठ्या कंपन्यांविरोधात केली मोठी कारवाई