Uniparts India IPO: भारतीय शेअरबाजाराचे निर्देशांक सार्वकालिक उच्चांकावर आहे. गुंतवणूकदार सध्या मालामाल होत असतानाच बुधवारी म्हणजेच 30 नोव्हेंबर 2032 रोजी गुंतवणूकदारांना शेअर बाजारात कमाईची आणखी एक संधी मिळणार आहे. युनिपार्ट्स इंडिया कंपनी आपली प्रारंभिक सार्वजनिक ऑफर अर्थात आयपीओ घेऊन आली आहे आणि  युनिपार्ट्स इंडियाचा आयपीओ उद्या किरोकळ गुंतवणूकदारांसाठी उघडणार आहे. दरम्यान युनिपार्ट्स इंडिया कंपनीचे शेअर्स  ग्रे मार्केटमध्ये Rs 80 (GMP) च्या प्रीमियमवर उपलब्ध आहेत.


युनिपार्ट्स इंडिया कंपनी ही अभियांत्रिकी प्रणाली आणि उपाय प्रदान करणारी कंपनी म्हणून ओळखली जाते. या कंपनीचे शेअर्स सोमवारी म्हणजे 12 डिसेंबर 2022 रोजी स्टॉक एक्सचेंज BSE आणि NSE वर सूचीबद्ध होण्याची अपेक्षा आहे. त्यासाठी बोली उद्यापासून म्हणजे 30 नोव्हेंबर रोजी सुरु होईल आणि समाप्ती 2 डिसेंबर रोजी होईल.


प्राइस बँड म्हणजे काय ते जाणून घ्या


अभियांत्रिकी प्रणाली आणि सोल्यूशन्स प्रदाता युनिपार्ट्स इंडियाने त्यांच्या रु. 836 कोटी आयपीओसाठी प्रति शेअर 548-577 किंमत बँड निश्चित केला आहे. वृत्तसंस्था पीटीआयच्या मते, आयपीओ पूर्णपणे प्रवर्तक आणि विद्यमान गुंतवणूकदारांच्या 14,481,942 शेअर्सच्या ऑफर फॉर सेल (OFS) वर आधारित आहे. पब्लिक इश्यूमधून कंपनीला कोणतेही उत्पन्न मिळणार नाही.


OFS मध्ये शेअर्स ऑफर करणाऱ्यांमध्ये प्रवर्तक समूह संस्था द करण सोनी 2018 CG-NG नेवाडा ट्रस्ट, द मेहर सोनी 2018 CG-NG नेवाडा ट्रस्ट, पामेला सोनी आणि गुंतवणूकदार अशोका इन्व्हेस्टमेंट होल्डिंग्स लिमिटेड आणि अंबादेवी मॉरिशस होल्डिंग लिमिटेड यांचा समावेश आहे. 


दरम्यान, FY22 मध्ये कंपनीच्या आंतरराष्ट्रीय विक्रीचा वाटा एकूण विक्रीच्या 82 टक्क्यांहून अधिक आहे. गेल्या तीन आर्थिक वर्षांत महसूल आणि मार्जिनमध्ये स्थिर वाढ झाली आहे. त्याची मार्केट कॅप सुमारे 2,604 कोटी रुपये आहे.


नवीनतम ग्रे मार्केट प्रीमियम


बाजारातील सहभागींनी दिलेल्या माहितीप्रमाणे,  युनिपार्ट्स इंडिया कंपनीचा आयपीओ ग्रे मार्केट प्रीमियम (GMP) 80 रुपयांच्या आसपास दिसला. वरच्या बँडची किंमत प्रति इक्विटी शेअर 577 रुपये आहे. एका लॉटमध्ये 25 शेअर्स आहेत आणि किरकोळ गुंतवणूकदार 1,87,525 रुपयांच्या प्राइस बँडमध्ये जास्तीत जास्त 13 लॉटमध्ये 325 शेअर्स खरेदी करू शकतात.