Signature Global IPO: मागील काही महिन्यात शेअर बाजारात आलेल्या काही कंपन्यांच्या आयपीओला चांगला प्रतिसाद मिळाला. आता, रियल्टी क्षेत्रातील सिग्नेचर ग्लोबल लिमिटेड कंपनीचा IPO येणार (Signature Global IPO) आहे. मागील काही महिन्यात शेअर बाजारात अनेक कंपन्यांनी आपला आयपीओ आणला होता. या आयपीओंना गुंतवणूकदारांनी चांगला भरभरून प्रतिसाद दिला होता. त्यानंतर आता, आणखी काही कंपन्या शेअर बाजारात आपला आयपीओ आणण्यास उत्सुक आहेत. 


रियल्टी क्षेत्रातील महत्त्वाच्या ब्रॅण्डपैकी एक असणाऱ्या सिग्नेचर ग्लोबल इंडिया लिमिटेड या कंपनीचा आयपीओ येणार आहे. सेबीने कंपनीला 1000 कोटींचा निधी उभारण्यासाठी परवानगी दिली आहे. सिग्नेचर ग्लोबल इंडिया लिमिटेडने जुलै महिन्यात सेबीकडे दस्ताऐवज जमा केले होते. त्यानंतर सेबीने सगळ्या दस्ताऐवजांची पाहणी केल्यानंतर कंपनीच्या आयपीओला मंजुरी दिली आहे. 


सिग्नेचर ग्लोबल इंडिया लिमिटेड ही मुख्यत: परवडणारी घरे आणि मिड-हाउसिंग सेगमेंटमध्ये कार्यरत आहे. आयपीओद्वारे कंपनीकडून 750 कोटींचे नवीन शेअर्स जारी केले जाणार आहेत. त्याशिवाय कंपनीकडून प्रमोटर्स आणि गुंतवणूकदारांकडून 250 कोटी रुपये ऑफर फॉर सेलच्या माध्यमातून उभे करणार आहेत. आयपीओतून मिळणाऱ्या निधीतून कंपनी कर्जाची परतफेड, जमीन खरेदी आणि व्यावसायिक कारणांसाठी त्याचा वापर करण्यात येणार आहे. त्याशिवाय या निधीतून सिग्नेचर फर्मची उपकंपन्यांच्या कर्जाची परतफेड करण्यात येणार आहे.


सिग्नेचर ग्लोबल इंडिया लिमिटेडची वर्ष 2021-22 मध्ये एकूण उत्पन्न 939.6 कोटी रुपये इतके होते. मागील आर्थिक वर्षात 154.7 कोटी रुपये इतके होते. कंपनीने सेबीला दिलेल्या माहितीनुसार, मागील एक दशकापेक्षाही कमी कालावधीत 31 मार्च 2022 पर्यंत 23,453 निवासी आणि व्यावसायिक गाळे विक्री केली आहे. हे सर्व दिल्ली-एनसीआर भागात विक्री केली आहे.


कंपनीने मागील आर्थिक वर्षात 115.5 कोटींचा निव्वळ तोटा नोंदवला होता. त्याआधीच्या आर्थिक वर्षात निव्वळ तोटा हा 86.27  कोटी रुपये इतका होता.  मागील आर्थिक वर्षात कंपनीचा खर्च हा 1076 कोटी रुपये होता.  त्याआधीच्या आर्थिक वर्षात हा खर्च 246.65 कोटी रुपये होता. 


बिकाजी फूडसकडून चांगला परतावा


बिकाजी फूड्सचा आयपीओ प्रीमियम दरासह बाजारात लिस्ट झाला होता. बिकाजी फूड्सच्या शेअर दरात तेजी कायम आहे. 16 नोव्हेंबर रोजी बाजारात लिस्ट झाल्यानंतर शेअर दरात 33 टक्क्यांनी वाढ झाली असून 436 रुपयांच्या स्तरावर पोहचला आहे. बिकाजी फूड्सची लिस्टिंग प्राइस 322.80 रुपये होती. 


इतर महत्त्वाच्या बातम्या: