Share Market IPO : या वर्षात शेअर बाजारात इनिशिअल पब्लिक ऑफरिंगच्या माध्यमातून (IPO)अनेक कंपन्या शेअर बाजारात सूचीबद्ध झाल्यात. यातील काही आयपीओने गुंतवणुकदारांना मालामाल केले. तर काही कंपन्यांच्या आयपीओने सूचीबद्ध होताना फारसा परतावा दिला नव्हता. आता डिसेंबर महिन्यात 10 कंपन्यांनी 10 हजार कोटी रुपयांचा आयपीओ बाजारात आणण्याची तयारी केली आहे.


कोणत्या कंपन्याचे आयपीओ येणार 


डिसेंबर महिन्यात आनंद राठी वेल्थचा आयपीओ 2 डिसेंबर रोजी खुला झाला. ही कंपनी आर्थिक सेवा पुरवते. रेटगेन कंपनीचा आयपीओ 7-9 डिसेंबर दरम्यान खुला होणार आहे. रेटगेन कंपनी 1335 कोटी रुपयांचा निधी उभारणार आहे. ही कंपनी पर्यटन आणि आतिथ्य सेवेशी संबंधित आहे. त्याशिवाय ग्लोबल हेल्थ लिमिटेड, फार्मसी रिटेल चेन मेडप्लस हेल्थ सर्व्हिसेस,  हेल्थियम मेडटेक या महत्त्वाच्या कंपन्यांचा डिसेंबर महिन्यात आयपीओ येणार आहे. 


या कंपन्यांशिवाय, मेट्रो ब्रँड्स, श्रीराम प्रॉपर्टीज, एजीएस ट्रान्झॅक्ट टेक्नॉलॉजीज, श्री बजरंग पॉवर अँड इस्पात, व्हीएलसीसी हेल्थ केअर या कंपन्यांचे आयपीओ शेअर बाजारात येणार आहेत. 


मागील महिन्यातही 10 आयपीओ


सरत्या नोव्हेंबर महिन्यात 10 कंपन्यांचे आयपीओ शेअर बाजारात आले होते. स्टार हेल्थ अँड अलाईड इन्शुरन्स आणि टेगा इंडस्ट्रीजचे आयपीओ खुले आहेत. याच महिन्यात या कंपन्या बाजारात सूचीबद्ध होणार आहेत. मागील महिन्यात पेटीएम कंपनी सूचीबद्ध झाली होती. मात्र, अपेक्षेप्रमाणे गुंतवणुकदारांना परतावा मिळाला नाही. कंपनीच्या शेअरला पहिल्याच दिवशी लोअर सर्किट लागले होते.


इतर महत्त्वाच्या बातम्या:


LIC IPO:तुमच्याजवळ LIC ची पॉलिसी असेल तर IPOमध्ये किती होईल फायदा? पैसे गुंतवावे का?


नोकरी सोडल्यानंतरही मिळणार PF आणि पेन्शनचा लाभ, EPFO करत आहे 'हा' बदल


Gold : सोने विक्रेत्यांनो सावधान...आजपासून विना हॉलमार्क सोनं विक्री केल्यास कारवाई होणार


 


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha