Gold Rate Today: सोनाच्या दरात आजही घसरण पाहायला मिळालीय. तर, चांदीच्या किंमतीत आणखी वाढ झाली. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याच्या किंमतीत 0.22 टक्क्यांनी घट झालीय. तर, चांदी 0.04 टक्क्यांनी महागली आहे. सध्या एक किलो चांदीचा भाव 62 हजार 313 रुपये आहे. 


24 कॅरेट सोन्याची किंमत
दिल्लीत आज 24 कॅरेट सोन्याचा भाव 51 हजार 260  रुपये इतका झाला आहे. चेन्नईत 24 कॅरेट सोन्याचा भाव 48 हजार 960 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.  कोलकाता येथील सोन्याचा भाव 49 हजार 990 रुपये आहे. तर, मुंबईत आज 24 कॅरेटचा दर 48 हजार 110 रुपये आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात आज स्पॉट गोल्ड 0.1 टक्क्यांनी वाढून 1 हजार 775 डॉलर प्रति औंस झालाय. तर, चांदीच्या फ्युचर्सचे भाव प्रति औंस  22.815 वर गेले आहेत.


कमी किंमतीत सोनं खरेदी करण्याची संधी
केंद्र सरकारकडून सर्वांना स्वस्तात सोनं खरेदी करण्याची संधी देत आहे. ग्राहकांना येत्या 3 डिसेंबरपर्यंत स्वस्तात सोनं खेरदी करता येणार आहे. आयबीआयच्या म्हणण्यानुसार, बॉण्डची इश्यू किंमत 4 हजार 791 रुपये प्रति ग्रॅम निश्चित करण्यात आली. याशिवाय, डिजीटल व्यवहार करणाऱ्या गुंतवणूकदारांना प्रति ग्रॅम 50 रुपयांच्या सवलतीचा लाभ मिळणार आहे. त्यानुसार, डिजीटल व्यवहार करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी गोल्ड बॉण्डची किंमत 4 हजार 741 रुपये प्रति ग्रॅम असेल


एका एसएमएसवर मिळवा सोन्याचे आजचे दर
तुम्हाला आता घरबसल्या सोन्याचे आजचे ताजे दर जाणून घेता येणार आहे. इंडियन बुलियन अॅण्ड ज्वेलर्स असोसिएशननुसार 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल देऊन सोन्याचे आजचे दर जाणून घेता येऊ शकतात. 


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha


हे देखील वाचा-