Cool Caps Industries IPO : देशातील आयपीओ मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर ओघ सुरू आहे. एकामागून एक अनेक कंपन्या त्यांचे आयपीओ आणत आहेत. यात आता कूल कॅप्स इंडस्ट्रीजचा आयपीओसुद्धा येणार आहे. ही प्लास्टिक बाटल्यांची कॅप बनवणारी कंपनी असून पुढील आठवड्यात 10 मार्च 2022 रोजी हा इश्यू उघडेल आणि 15 मार्च 2022 रोजी बंद होईल.


प्राइस बँड अजून ठरलेली नाही


11.628 कोटी रुपयांच्या या सार्वजनिक इश्यूद्वारे कूल कॅप्स इंडस्ट्रीजने बुक बिल्डिंग प्रक्रियेअंतर्गत 30,60,000 इक्विटी शेअर्सची विक्री करण्याचा प्रस्ताव दिला आहे. या आयपीओसाठी किंमत बँड पुढील आठवड्याच्या सुरुवातीला निश्चित होण्याची अपेक्षा आहे.


बाजारातील भरपूर संधी


"आम्ही एका उदयोन्मुख उद्योगात आहोत. कारण सुरक्षित आणि ब्रँडेड अन्न आणि पेय उत्पादनांच्या वापरासह मागणी वाढते आहे. प्रत्येक बाटलीबंद उत्पादनाला कॅप आणि क्लोजर आवश्यक असते, त्यामुळे बाजारात आमच्यासाठी भरपूर संधी आहे. आमच्या ग्राहकांसोबतचे आमचे दीर्घकालीन नातेसंबंध आणि आमची क्षमता त्यांच्या आधारावर आम्ही वाढीच्या संधींचा फायदा घेण्यासाठी चांगल्या स्थितीत असल्याचं,"  कंपनीचे प्रवर्तक आणि अध्यक्ष आणि एमडी राजीव गोएंका म्हणाले आहेत.   


11.628 कोटी रुपये उभारण्याची योजना 


कंपनी सार्वजनिक ऑफरद्वारे 11.628 कोटी रुपये उभारण्याची योजना आखत आहे. कंपनी आयपीओमधून मिळालेली रक्कम तिच्या खेळत्या भांडवलाच्या गरजेसाठी आणि सामान्य कॉर्पोरेट हेतूंसाठी वापरेल. या आयपीओचे लीड मॅनेजर होलानी कन्सल्टंट प्रा. लि. आहे.


कूल कॅप्स इंडस्ट्रीजच्या प्रवर्तकांमध्ये पूर्वीचे फ्लेक्सीपॅक प्रा. लि. श्री राजीव गोयंका आणि श्री वंश गोयंका आहेत. कंपनीच्या ग्राहकांमध्ये बिस्लेरी, किंगफिशर, IRCTC, पतंजली, क्लियर इत्यादींचा समावेश आहे, ज्यांना ती प्लास्टिकच्या बाटलीच्या कॅप्स पुरवते.


महत्वाच्या बातम्या