Swiggy IPO Plans : झोमॅटोनंतर (Zomato) दुसरी फूड डिलिव्हरी कंपनी म्हणून स्विगीकडे (Swiggy) पाहिलं जातं. आता स्विगी देखील स्टॉक मार्केटमध्ये सूचीबद्ध होण्याची तयारी करत आहे. Swiggy $800 दशलक्ष म्हणजेच 6,000 कोटी रुपयांचा IPO आणण्याच्या तयारीत आहे. 


रिपोर्ट्सनुसार, स्विगीने ताज्या फंडिंग राऊंडमध्ये त्याचे मूल्यांकन $ 10.7 बिलियन केले आहे, जे दुप्पट आहे. स्विगीला केवळ फूड डिलिव्हरी न करता एक लॉजिस्टिक कंपनी म्हणून स्वतःला प्रोजेक्ट करायचे आहे. या कंपनीने आयपीओ आणण्यापूर्वी स्वतंत्र संचालकांची नियुक्ती करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. 


2021 मध्ये, Swiggy ची प्रतिस्पर्धी कंपनी Zomato शेअर बाजारात लिस्ट झाली. झोमॅटोला शेअर बाजारात चांगला प्रतिसाद मिळाला. लिस्टींग नंतर झोमॅटोने सूचीपासून अत्यंत निराशाजनक कामगिरी दर्शविली आहे. झोमॅटोचा आयपीओ 76 रुपये प्रति शेअर या भावाने आला. जो 169 रुपयांवर गेल्यानंतर आता 80 रुपयांच्या जवळ व्यवहार करत आहे. तिसऱ्या तिमाहीत कंपनीच्या ऑर्डर व्हॅल्यूच्या वाढीने निराशा केली आहे. Swiggy आणि Zomato च्या विक्रीची तुलना करताना, Swiggy ने डिसेंबर महिन्यात $ 250 दशलक्षची विक्री दर्शविली आहे, तर Zomato ने ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीत $ 733 दशलक्ष विक्री दर्शविली आहे. 


भारतातील फूड डिलिव्हरी व्यवसाय असो, किराणा डिलिव्हरी व्यवसायाने कोरोना महामारीच्या काळात प्रचंड वाढ दर्शविली आहे. स्विगीने क्विक कॉमर्स डिलिव्हरी सेगमेंटमध्ये प्रवेश केला आहे ज्यामध्ये टाटा समूहाच्या बिग बास्केट, रिलायन्स इंडस्ट्रीज-समर्थित डन्झोद्वारे आव्हान दिले जात आहे.  


महत्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha