Bikaji Foods IPO : पाणीपुरी, कचोरीसह चॅट आयटम्ससाठी प्रसिद्ध असलेलं बीकाजी फूड्स लवकरच शेअर बाजारातही आयपीओची डिश आणणार आहे. तब्बल एक हजार कोटींचा आयपीओ आणायची तयारी बीकाजीने केली असून यासाठी बाजार नियामक सेबीकडे ( SEBI) ड्राफ्ट पेपर दाखल करणार असल्याची माहिती सूत्रांची आहे.
मिठाई आणि नमकीन तयार करणारी कंपनी बीकाजी फूड्स इंटरनॅशनल ( Bikaji Foods International) आपला आयपीओ घेऊन येत आहे. कंपनी यासाठी शेअर बाजार नियामक सेबीकडे ( SEBI) ड्राफ्ट पेपर ( Intial Public Offering) दाखल करणार आहे. या आयपीओ अंतर्गत एक हजार कोटी रुपयांपर्यंतचे नवीन शेअर्स जारी केले जाण्याची शक्यता आहे. या आयपीओतून कंपनीला 7500 कोटी रुपये मिळण्याची आशा आहे. ( Draft Red Herring Prospectus) राजस्थानमधील बीकाजी फूड्स इंटरनॅशनल ( Bikaji Foods International) कंपनीने आयपीओ आणण्यासाठी आयआयएफएल सिक्योरिटिजला बँकर म्हणून नियुक्त केले आहे. बीकाजी कंपनीचा आयपीओ सध्या गुंतवणूकदारांसाठी ऑफर फॉर सेल ( Offer For Sale) अंतर्ग विकला जाणार आहे.
खासगी इक्विटी कंपनी लाइटहाउस फंड्स, आयआयएफएल, एव्हेंडस आणि एक्सिसने बीकाजी फूड्स ( Bikaji Foods International) या कंपनीमध्ये गुंतवणूक केली आहे. Bikaji Foods चे मॅन्युफॅक्चरिंग प्लांट्स राजस्थान, असम, कर्नाटकमध्ये आहेत. Bikaji Foods भुजिया, नमकीन, पापड, मिठाई याशिवाय फ्रोझन फूड्सही तयार करते. कंपनीचे प्रवर्तक शिव रतन अग्रवाल आणि दीपक अग्रवाल यांच्याकडे 2020 या आर्थिक वर्षाच्या अखेरपर्यंत 78.8 टक्के भागिदारी होती. आयपीओमधून मिळणाऱ्या पैशांमधून कंपनीचा विस्तार करण्याची योजना आखली आहे. तसेत, या पैशातून नवीन प्रॉडक्ट्सही लाँच करण्याचा कंपनीचा विचार आहे. 2020 आर्थिक वर्षाच्या अखेरीस कंपनीचं उत्पन्न 1073 कोटी रुपये होतं. कंपनीच्या एकूण विक्रीमध्ये नमकीनची भागिदारी 37 टक्के इतकी आहे. तर भूजिया 32 टक्के, मिठाई 14 टक्के आणि पापड 10 टक्केंचा वाटा आहे. भारतामध्ये रेडी टू इट ( Ready To Eat) स्नॅक्स मार्केटमध्ये वेगाने विक्री होत आहे. 2021 ते 2025 यादरम्यान 8.9 टक्के विकासदर असण्याची शक्यता वर्त