Share Market: गेल्या महिन्यात आयपीओ मार्केटमध्ये मोठ्या घडामोडी घडल्या. सप्टेंबर महिन्यात एकूण 12 मेनबोर्ड आणि 40 एसएमई कंपन्या शेअर बाजारावर सूचिबद्ध झाल्या. या वर्षी जवळपास प्रत्येक आठवड्याला एकतरी कंपनी आपला आयपीओ घेऊन येत आहे. सोमवार म्हणजेच 7 ऑक्टोबरपासून चालू होणारा हा आठवडा गुंतवणूकदारांसाठी फारच महत्त्वाचा असणार आहे. कारण या दिवशी दोन कंपन्यांचे आयपीओ गुंतवणुकीसाठी खुले होणार आहेत. यातील एक आयपीओ ह मेनबोर्ड तर एक आयपीओ हा एसएमई आयपीओ असणार आहे.
मेनबोर्ड सेगमेंटमध्ये येणाऱ्या आयपीओचे नाव हे गरुड कंस्ट्रक्शन अँड इंजिनिअरिंग (Garuda Construction and Engineering) आणि एसएमई श्रेणीत येणाऱ्या आयपीओचे नाव शिव टेक्सकेम (Shiv Texchem) असे आहे.  


8  ऑक्टोबरला दोन्ही आयपीओ खुले होणार


गरुड कंस्ट्रक्शन अँड इंजिनिअरिंग या कंपनीच्या आयपीओची कित्येकजण वाट पाहात आहेत. हा आयपीओ एकूण 264 कोटी रुपयांचा असणार आहे. येत्या 8 ऑक्टोबरपासून हा आयपीओ गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. या आयपीओचा किंमत पट्टा 92 ते 95 रुपये असणार आहे. म्हणजेच या आयपीओचा एक लॉट घेण्यासाठी तुमच्याकडे कमीत कमी 14,444 रुपये असायला हवेत. तर शिव टेक्सकेम हा आयपीओ एकूण 101 कोटी रुपयांचा असेल. 8 ते 10 ऑक्टोबर या काळात तुम्हाला या आयपीओत गुंतवणूक करता येईल. या आयपीओचा किंमत पट्टा 158 ते 166 रुपये आहे. या आपयीओचा एक लॉट घेण्यासाठी तुमच्याकडे कमीत कमी 1 लाख 26 हजार 400 रुपये असायला हवेत. 


एसएमई श्रेणीतील 6 कंपन्या सूचिबद्ध होणार 


याशिवाय ख्याती ग्लोबल व्हेंचर्स (Khyati Global Ventures) चा आयपीओ 8 ऑक्टोबर रोजी गुंतवणुकीसाठी बंद होणार आहे. यासह एसएमई श्रेणीतील 6 कंपन्या शेअर बाजारावर सूचिबद्ध होणार आहेत. यामध्ये एचव्हीएएक्स टेक्नोलॉजीस (HVAX Technologies), साज होटल्स (Saj Hotels) या कंपन्या 7 ऑक्टोबर रोजी सूचिबद्ध होणार आहेत. तर सुबम पेपर्स (Subam Papers), पॅरामाऊंट डाई टेक (Paramount Dye Tec) या कंपन्या 8 ऑक्टोबरला सूचिबद्ध होणार आहेत. नियोपॉलिटिन पिज्जा अँड फूड्स (NeoPolitan Pizza and Foods) ही कंपनी 9 ऑक्टोबर रोजी तर ख्याती ग्लोबल ही कंपनी 11 ऑक्टोबर रोजी शेअर बाजारावर सूचिबद्ध होणार आहे.


26 कंपन्या आणणार 72,000 कोटींचे आयपीओ 


या वर्षाच्या डिसेंबर महिन्यापर्यंत अनेक महत्त्वाच्या कंपन्यांचे आयपीओ येणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार एकूण 26 कंपन्या साधारण 72,000 कोटी रुपयांचे आयपीओ घेऊन येणार आहेत. या आयपीओंना सेबीकडून मंजुरी मिळालेली आहे. तर उर्वरित 55 कंपन्यांना 89,000 कोटी रुपयांच्या आयपीओंच्या मंजुरीची प्रतीक्षा आहे. लवकरच 25 हजार कोटी रुपयांचा ह्युंदाई मोटर इंडिया (Hyundai Motor India) हा आयपीओ येणार आहे. हा आयपीओ एलआयसीपेक्षाही मोठा असणार आहे. 


हेही वाचा :


1 लाखाचे झाले 10000000 रुपये, 'या' पेनी स्टॉकने अनेकांना केलं करोडपती!


इराण-इस्रायलच्या युद्दात 'या' कंपन्या तुम्हाला करणार मालामाल, जाणून घ्या स्टॉपलॉस, टार्गेट काय असावे?