Multibagger Stocks: शेअर बाजारात दीर्घकालीन गुंतवणुकीचा दृष्टीकोन ठेवल्या, फायदा होतो. हाच दृष्टीकोन ठेवून गुंतवणूक केल्यानंतर अनेक कंपन्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना दमदार रिटर्न्स दिलेले आहेत. Transformers and Rectifiers ही कंपनीदेखील अशीच आहे. या कंपनीत दीर्घकाळासाठी ज्यांनी गुंतवणूक केलेली आहे, त्यांना चांगले रिटर्न्स मिळाले आहेत. कधीकाळी या कंपनीच्या शेअरचे मूल्य अवघे 6.50 रुपये होते. मात्र आता हा शेअर थेट 670 रुपयांवर पोहोचला आहे. फक्त चार वर्षांत या कंपनीच्या शेअरने थेट आकाशाला गवसणी घातली आहे. 


एका वर्षात थेट 300 टक्क्यांनी शेअर वाढला 


या कंपनीच्या शेअरचे मूल्य 9 एप्रिल 2020 रोजी अवघे 6.50 रुपये होते. मात्र शुक्रवारी (4 ऑक्टोबर) या शेअरचे मूल्य 671 रुपयांवर पोहोचले. म्हणजेच अवघ्या चार वर्षात या शेअरने मोठी भरारी घेतली आहे. गेल्या सहा महिन्यात या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 45 टक्क्यांनी रिटर्न्स दिले आहेत. या वर्षाच्या सुरुवातीला हा शेअर 238.70 रुपयांवर होता. सहा महिन्यांपूर्वी या कंपनीत एखाद्या गुंतवणूकदारांने गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला असता तर आतापर्यंत संबंधित गुंतवणूकदाराला 185 टक्के फायदा झाला असता. एका वर्षाचा हिशोब करायचा झाल्यास, हा शेअर एका वर्षात तब्बल 300 टक्क्यांनी वाढला आहे. मात्र मागील महिन्यात या शेअरने फारशी चांगली कामगिरी केलेली नाही. गेल्या महिन्यात या मल्टिबॅगर स्टॉकमध्ये साधारण 7 टक्क्यांची घसरण झालेली आहे. 


एक लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळाले एक कोटी रुपये


या कंपनीच्या शेअरमध्ये 9 एप्रिल 2020 पासून आतापर्यंत साधारम 10350 टक्क्यांची तेजी आली आहे. म्हणजेच एखाद्या व्यक्तीने साधारण चार वर्षांपूर्वी या कंपनीत एक लाख रुपये रुपयांची गुंतवणूक केली असती, तर आतापर्यंत या एक लाख रुपयांचे 1.04 कोटी रुपये झाले असते. Transformers and Rectifiers या कंपनीचे 52 आठवड्यातील सर्वोच्च मूल्य 845.70 रुपये तर 52 आठवड्यातील निचांकी मूल्य 142.10 रुपये आहे. या कंपनीचे बाजार भांडवल 10,070.56 कोटी रुपये आहे.  
 
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)


हेही वाचा :


खरं सोनं नेमकं ओळखावं तरी कसं? शुद्ध दागिना ओळखण्यासाठी फक्त 'या' सोप्या गोष्टी चेक करा


आलेला पगार पुरत नाहीये? फक्त 'या' पाच सोप्या टिप्स फॉलो करा, बँकेत जमा होतील बक्कळ पैसे!


बापरे बाप! 10 हजारांचे झाले तब्बल 5300000 रुपये, एका वर्षात 'या' शेअरने अनेकांना केलं मालमाल!