Relationship Tips: अवघ्या देशभरात नवरात्रोत्सवाचा (Navratri 2024) सण मोठ्या उत्साहात पार पडत आहे. या दिवसात विविध ठिकाणी देवीचा जागर करण्यात येतो. धार्मिक मान्यतेनुसार, नवरात्रीचा सण हा सकारात्मकतेचा आणि आनंदाचा सण आहे. देवी दुर्गेची नऊ रूपे आपल्याला वेगवेगळे धडे शिकवतात. तुमच्या नात्यात हे धडे लागू करून तुम्ही तुमचं नातं आनंदी आणि मजबूत बनवू शकता. देवी दुर्गेच्या नऊ रूपांपासून शिकलेल्या नऊ धड्यांबद्दल जाणून घेऊया, जे तुमच्या नात्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतात.


 


देवीच्या नऊ रूपांची पूजा


नवरात्रीचा उत्सव नऊ दिवस साजरा केला जातो, ज्यामध्ये देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. देवीच्या या नऊ रूपांचे वेगळे महत्त्व आहे, जे आपल्याला जीवनातील अनेक धडे देतात. आज आम्ही तुम्हाला देवी दुर्गेच्या नऊ रूपांमधून तुमचं नातं मजबूत बनवण्यासाठी काय शिकू शकतो ते सांगणार आहोत. या रिलेशनशिप टिप्सला तुम्ही तुमच्या नात्याचा भाग बनवल्यास तुमच्या नात्यातील सर्व समस्या नक्कीच दूर होतील. 


 


देवी दुर्गेच्या 9 रूपांमधून शिका 9 धडे


शैलपुत्री- पहिले रूप हिमालयाची कन्या पार्वतीचे मानले जाते. हे आपल्याला शिकवते की एखाद्या नात्याचा पाया मजबूत असावा. जसा पर्वत मजबूत असतो तसाच नात्याचा पाया भक्कम असायला हवा.


ब्रह्मचारिणी - दुर्गेचे आणखी एक रूप हे ज्ञान आणि तपश्चर्याचे प्रतीक आहे. हे आपल्याला शिकवते की नात्यात संयम आणि समर्पण असावे. तसेच, ज्ञान असणे महत्त्वाचे आहे, जेणेकरून आपण एकमेकांना समजून घेऊ शकू.


चंद्रघंटा - हे रूप शांती आणि सौंदर्याचे प्रतीक आहे. यावरून नात्यात समतोल असायला हवा. तरच नाती गोड राहतात. राग आणि शांती या दोन्हींचे स्वतःचे महत्त्व आहे. त्यामुळे त्यांच्यात समतोल राखणे महत्त्वाचे आहे.


कुष्मांडा - चौथे रूप सृष्टीच्या कार्याचे प्रतीक आहे. हे आपल्याला शिकवते की, नात्यात सकारात्मकता असली पाहिजे. नकारात्मकतेमुळे नाती कमकुवत होतात. आपल्या जोडीदाराबद्दल किंवा त्यांच्याबद्दलच्या कोणत्याही गोष्टीबद्दल नकारात्मक विचार करणे किंवा नेहमी भांडणे यामुळे नाते कमकुवत होते.


स्कंदमाता - पाचवे रूप हे मातृत्वाचे प्रतीक आहे. हे आपल्याला शिकवते की नात्यात बिनशर्त प्रेम असले पाहिजे. तसेच एकमेकांना आधार देणंही महत्त्वाचे आहे.


कात्यायनी - हे रूप शक्ती आणि सौंदर्याचे प्रतीक आहे. हे आपल्याला शिकवते की, नातेसंबंधात एकमेकांच्या बाजूने उभे राहिले पाहिजे. तसेच, एकमेकांचा आदर करणे महत्त्वाचे आहे.


कालरात्री - हे रूप दुष्टांचा नाश करणारे मानले जाते. हे आपल्याला शिकवते की, नात्यात कठीण प्रसंग आला तरीही आपण एकत्र राहायला हवे आणि अडचणींचा सामना करायला शिकले पाहिजे.


महागौरी - आठवे रूप हे क्षमा आणि शांतीचे प्रतीक आहे. हे आपल्याला शिकवते की, नात्यात आपण एकमेकांना क्षमा करायला शिकले पाहिजे. याशिवाय हृदय आणि मन साफ ठेवणंही महत्त्वाचे आहे.


सिद्धिदात्री – नववे रूप हे यशाचे प्रतीक आहे. हे आपल्याला शिकवते की नात्यात आपण एकमेकांना महत्त्व दिले पाहिजे आणि समर्थन केले पाहिजे. तरच नाती यशस्वी होतात.


 


हेही वाचा>>>


Happy Relationship साठी 'या' 3 बाऊंड्रीज सेट करा, नातं होईल घट्ट, जोडीदाराचं वाढेल प्रेम


 


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )