Stock market : 2024 हे वर्ष शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक (Stock market Investment) करणाऱ्यांसाठी फायद्याचे ठरले आहे. या वर्षात शेअर बाजारातील (Stock market) गुंतवणूकदारांच्या कमाईत 21 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. हा आकडा बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या मार्केट कॅपशी जोडलेला आहे. गुंतवणुकदारांनी एकूण 77.77 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे. विशेष म्हणजे चालू वर्षात बीएसईचे मार्केट कॅप 5 ट्रिलियन डॉलर्सच्या पुढे गेले आहे. मात्र, गेल्या तीन महिन्यांत शेअर बाजारात सातत्याने घसरण होत आहे.


गेल्या काही महिन्यात बीएसईचे मार्केट कॅप घटले होते, त्यामुळं गुंतवणूकदारांचेही नुकसान झाले आहे. त्यानंतरही बीएसईच्या मार्केट कॅपमध्ये सलग 6 वर्षे वाढ झाली आहे. 2024 च्या सुरुवातीपासून असे मानले जात होते की 2021 मध्ये BSE चे मार्केट कॅप देखील विक्रम मोडेल, जेव्हा 41 टक्क्यांहून अधिक वाढ दिसून आली. 


भाग भांडवलात मोठी वाढ


बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या आकडेवारीनुसार, 2024 मध्ये बीएसईच्या मार्केट कॅपमध्ये 77,77,249.05 कोटी रुपयांची म्हणजेच 21.35 टक्के वाढ झाली आहे. जर आपण आकडेवारीवर नजर टाकली तर, 2023 च्या शेवटच्या ट्रेडिंग दिवशी BSE चे मार्केट कॅप 3,64,28,846.25 कोटी रुपये होते, जे या वर्षाच्या शेवटच्या ट्रेडिंग दिवशी 4,42,06,095.30 कोटींवर आले आहे. डॉलरच्या दृष्टीने पाहिले तर BSE चे मार्केट कॅप 5 ट्रिलियन डॉलर्सच्या पुढे गेले आहे. तसेच, मार्केट कॅपच्या बाबतीत हे जगातील 6 व्या क्रमांकाचे सर्वात मोठे स्टॉक एक्सचेंज आहे.


मार्केट कॅपमध्ये सलग 6 वर्षापासून वाढ


गेल्या वर्षी 2018 मध्ये वार्षिक आधारावर बीएसईच्या मार्केट कॅपमध्ये घसरण झाली होती. त्या वर्षी बीएसईच्या मार्केट कॅपला 7,25,401.19 कोटी रुपये किंवा 4.78 टक्के तोटा सहन करावा लागला. तेव्हापासून बीएसईच्या मार्केट कॅपमध्ये सातत्याने वाढ होत आहे. रकमेच्या बाबतीत, 2023 मध्ये सर्वाधिक 81,90,598.32 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. तथापि, रकमेच्या बाबतीत, गेल्या 6 वर्षातील सर्वात कमी वाढ 2019 मध्ये 11,05,363.35 कोटी रुपयांची झाली.


2021 चा विक्रम अबाधित


BSE च्या मार्केट कॅप वाढीच्या बाबतीत 2021 चा रेकॉर्ड देखील मोडला जाईल असे वाटत होते, पण हे होऊ शकले नाही. 2021 मध्ये बीएसईच्या मार्केट कॅपमध्ये 77,96,692.95 कोटी रुपयांची वाढ झाली होती. टक्केवारीनुसार 41.46 टक्के वाढ झाली आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे 2024 हे वर्ष मूल्य आणि टक्केवारीच्या बाबतीत 2021 च्या आकड्यांना मागे टाकू शकले नाही.


महत्वाच्या बातम्या:


सेबीनं 15000 वेबसाइटस अन् सोशल मीडिया स्टार्सवर बंदी घालत दिला दणका, शेअर मार्केट गुतवणुकीबाबत चुकीचा सल्ला देणं भोवलं