Devendra Fadnavis on Dhananjay Munde : बीड येथील मस्साजोग गावचे माजी सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh Case) यांचे हत्या प्रकरणाने सध्या राज्याचे वातावरण चांगलेच तापले आहे. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचा निकटवर्तीय असलेल्या वाल्मिक कराडवर (Walmik Karad) आरोप होत आहे. वाल्मिक कराड 22 दिवसांपासून फरार होता. मात्र, आज अचानक वाल्मिक कराडने पुण्यातील सीआयडीच्या कार्यालयात येत शरणागती (Walmik Karad Surrender) पत्करली. तर दुसरीकडे विरोधकांकडून मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. आता यावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी भाष्य केले आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मला या प्रकरणातील राजकारणात जायचे नाही. मी पहिल्यापासून सांगत आहे की, कोणाविरुद्ध पुरावा असेल तर द्या. आम्ही शोधत आहोत, पण कुणा दुसऱ्याकडे पुरावा असेल तरी त्यांनी द्यावा. माझ्याकरिता स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्येला कारणीभूत लोकांना शिक्षा होणे हे महत्त्वाचे आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
काही लोकांना केवळ राजकारण महत्त्वाचे
ते पुढे म्हणाले की, काही लोकांना केवळ राजकारण महत्त्वाचे आहे. त्यांचे राजकारण त्यांना लखलाभ असो. त्यांच्या राजकारणाने मला वाटत नाही की, फार काही फायदा होईल. त्यामुळे मला कुठल्याही राजकीय वक्तव्यावर जायचं नाही. त्याचं समर्थन करायचं नाही आणि विरोधही करायचा नाही. विरोधाकांनी राजकारण करत राहावे. मात्र, आमची भूमिका स्पष्ट आहे की, संतोष देशमुख यांना न्याय मिळवून द्यायचा आणि तो आम्ही मिळवून देणार, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
बीड प्रकरणात कोणालाही सोडणार नाही
दरम्यान, वाल्मिक कराडच्या सरेंडरवर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटलंय की, बीड प्रकरणात आम्ही कोणालाही सोडणार नाही. ज्याचा ज्याचा संबंध आढळेल त्या प्रत्येकावर कारवाई करण्यात येईल. गुंडांचे राज्य आम्ही चालू देणार नाही. या प्रकरणाचा अतिशय गतिशील तपास केलेला आहे. त्यामुळेच आज वाल्मिक कराडला शरणागती पत्करावी लागली आहे. आता हत्येतील जे आरोपी फरार आहेत, त्यांना पकडण्याकरिता वेगवेगळ्या टीम्स कामी लागलेल्या आहेत. कुठल्याही आरोपीला आम्ही सोडणार नाही, सगळ्यांना शोधून काढू, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
आणखी वाचा
दादा, तुम्ही शिवाजी महाराजांच्या विचारांचे पाईक; प्राजक्ता म्हणाली, सुरेश धसांविरूद्ध कारवाई नाही