Multibagger Stock: शेअर मार्केट हा गुंतवणकीचा (Investment) उत्तम मार्ग समजला जातो. गुंतवणुकीचा ही जरी जोखमीचा मार्ग असला तरी या माध्यमातून लोक लाखो रुपये कमावत आहेत. दरम्यान, मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या कंपनीच्या शेअर्सने गुंतवणुकदारांना लखपती केलं आहे. मुकेश अंबानींच्या आलोक इंडस्ट्रीज (Alok Industries Limited) या कंपनीच्या शेअर्सने गुंतवणुकदारांना मोठा फायदा करुन दिला आहे. या कंपनीच्या शेअर्सची किंमत अवघ्या चार वर्षांत 1 रुपयांवरून 27 रुपयांपर्यंत वाढली आहे. ज्यांनी कंपनीत 10000 रुपयांची गुंतवणूक केली होती, त्यांना 2 लाख रुपये मिळाले आहेत. 


गुंतवणुकदारांना 1800 टक्क्यांचा परतावा 


मुकेश अंबानींच्या कंपनीने गुंतवणुकदारांना मोठा नफा मिळवून दिला आहे. आलोक इंडस्ट्रीज या कंपनीच्या शेअर्सने गुंतवणुकदारांना मालामाल केलं आहे. या कंपनीने 2019 पासून आत्तापर्यंत गुंतवणुकदारांना 1800 टक्क्यांचा परतावा दिला आहे. या काळात 1 रुपयांचा शेअर्स 27.10 रुपयांपर्यंत गेला आहे. 2020 मध्ये याच शेअर्सची किंमत 5 रुपये होती. चार वर्षात या शेअर्सच्या किंमतीत मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. 


ज्या गुंतवणुकदारांनी आलोक इंडस्ट्रीज पैसे गुंतवलेत ते गुंतवणूकदार मालामाल झाले आहेत. ज्या गुंतवणूकदारांनी 10000 रुपयांची गुंतवणूक केली आहे, त्यांना 200000 लाख रुपये मिळाले आहेत. कमी गुंतवणुकीत गुंतवणूकदारांना मोठा फायदा मिळाला आहे. दरम्यान, आलोक इंडस्ट्रीज या कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी वाढ झाली आहे. त्याचा फायदा गुंतवणूकदारांना होतोय. 


आलोक इंडस्ट्रीज ही भारतीय वस्त्रोद्योग उत्पादन कंपनी 


आलोक इंडस्ट्रीज लिमिटेड ही कंपनी मुंबईतील एक मोठी भारतीय वस्त्रोद्योग उत्पादन कंपनी आहे.ही कंपनी मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या मालकीची आहे. आलोक इंडस्ट्रीज लिमिटेड ही भारतातील सर्वात मोठी वर्टिकल इंटिग्रेटेड टेक्सटाइल कंपनी आहे. या कंपनीचे भाग भांडवल हे 13550 कोटी रुपये आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजकडे आलोक इंडस्ट्रीज लिमिटेडचा 40.01 टक्के हिस्सा आहे. तर 34.99 टक्के हिस्सा हा जेएम फायनान्शियल ॲसेट रिकन्स्ट्रक्शनकडे आहे. 


महत्वाच्या बातम्या:


Reliance Industries: मुकेश अंबानी Viacom18 मधील पॅरामाउंटचा 13.01 टक्के हिस्सा करणार खरेदी