Investment Tips : भविष्यातील अडचणींचा सामना करण्यासाठी गुंतवणूक (Investment) महत्वाची असते. पण गुंतवणूक करताना आपल्याला काही गोष्टींचा विचार करावा लागतो. यामध्ये पहिली गोष्टी म्हणजे आपण गुंतवणूक करणारी रक्कम सुरक्षीत आहे का? आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या ठेवीवर आपल्याला परतावा किती मिळणार?या दोन्ही गोष्टींचा विचार करणं महत्वाचं आहे. अनेकवेळेला पैशांची गुंतवणूक केली जाते, मात्र, त्यातून हवा तेवढा परतावा मिळत नाही. त्यामुळं गुंतवणूक करताना नेमकी काय काळजी घ्यावी? तरुणांनी नेमका कुठं पैसा गुंतवावा याबद्दलची माहिती आपण पाहणार आहोत. 


जर तुम्हाला तुमचे आयुष्य खरोखरच मजेत जगायचे असेल तर तुम्ही तुमच्या पगारातून पैशांची बचत करायला हवी.  कारण बचतीमुळं तुम्हाला भविष्यात कोणत्याही प्रकारच्या अडचणी येणार नाहीत. जेव्हा अडचणी येतील तेव्हा तुम्हाला त्या हाताळणे कठीण होईल. त्यामुळं पैसा जवळ असणं गरजेचं आहे. त्यामुळं तुम्ही पहिल्या पगारापासूनच भविष्य सुरक्षित करण्याचे नियोजन करणं आवश्यक आहे.


आपत्कालीन निधी तयार करणं गरजेचं 


तुम्ही तमच्या पहिल्या पगापासूनचं आपत्कालीन निधी तयार करणं गरजेचं आहे. नोकरी गमावणे, व्यवसाय बंद पडणे किंवा कुटुंबातील कोणतीही मोठी समस्या अशा कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत आपत्कालीन निधी खूप उपयुक्त आहे. जर तुमच्याकडे हा निधी असेल, तर तुम्ही यातून कठीण काळात टिकून राहू शकता. आपत्कालीन निधीची रक्कम नेमकी किती असावी, याबाबत विविध तज्ञांनी मते व्यक्त केली आहेत. यामध्ये कोणत्याही व्यक्तीने त्याच्या सहा महिन्यांच्या पगाराएवढी रक्कम आपत्कालीन निधी म्हणून ठेवावी असं सांगण्यात आलं आहे.


आरोग्य विमा


आपण शक्य तितक्या लवकर आरोग्य विमा खरेदी करणे आवश्यक आहे. बहुतांश तरुण गुंतवणूकदार वैद्यकीय विमा घेणे ही त्यांची जबाबदारी मानत नाहीत. पण हे फार महत्वाचे आहे. आरोग्य आणीबाणी कधी येईल हे कोणालाच माहीत नाही. याशिवाय तुमचे पालकही वृद्ध असतील तर त्यांना या वयात हॉस्पिटलमध्ये जावे लागू शकते. जर तुम्ही या परिस्थितींसाठी स्वतःला तयार केले नाही तर तुम्हाला भविष्यात समस्यांना तोंड द्यावे लागेल. अनेक वेळा लोकांचे पैसे उपचारात वाया जातात आणि वाचवलेले पैसेही खर्च होतात. म्हणून, तुमच्या पहिल्या पगाराबरोबरच आरोग्य विमा सुरु करा.


पगाराच्या 20 टक्के गुंतवणूक 


तुमचा पगार छोटा असो वा मोठा, तुम्ही त्यातून गुंतवणूक करायला नक्कीच सुरुवात करावी. आर्थिक नियम सांगतो की प्रत्येक व्यक्तीने त्याच्या पगाराच्या किमान 20 टक्के गुंतवणूक करावी. तुम्ही जरी 20,000 रुपये कमावले तरी किमान 4000 रुपये वाचवा आणि गुंतवा. आजकाल, पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट, बँक एफडी, पीपीएफ, एलआयसी यासारख्या हमी परतावा देणाऱ्या योजनांव्यतिरिक्त, एसआयपी म्युच्युअल फंड सारख्या योजना देखील आहेत. एसआयपीच्या मदतीनं तुम्ही दीर्घकाळात करोडो रुपयांचा निधी देखील तयार करु शकता. जसजसे तुमचे उत्पन्न वेळोवेळी वाढत जाईल, तसतसे गुंतवणुकीची रक्कम वाढवत राहा आणि ती वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवा.


कर नियोजन करा


तुम्ही नोकरीच्या सुरुवातीच्या काळात कराच्या कक्षेत येत नाही, पण नंतर तुमचे उत्पन्न वाढल्यावर तुम्हालाही कर भरावा लागेल. म्हणून, तुमच्या करांचे आगाऊ नियोजन करायला शिका आणि तुमचे पैसे अशा ठिकाणी गुंतवा जिथे तुम्हाला कर सूट मिळू शकेल. कर वाचवून, तुम्ही पैसे वाचवू शकाल आणि तुमच्या गरजेनुसार त्याचा वापर करू शकाल.


महत्वाच्या बातम्या:


SIP Investment : दर महिन्याला फक्त 10 हजार रुपये गुंतवा आणि करोडपती व्हा, कमी वेळेत कोट्यधीश करणारी ही स्किम आहे तरी काय?