Shani Dev : ज्योतिषशास्त्रात, शनिदेवाला न्याय देवता आणि कर्माचा दाता म्हणून ओळखलं जातं.  शनिदेव (Shani Dev) लोकांना त्यांच्या कर्मानुसार चांगले किंवा वाईट परिणाम देतो. शनीच्या प्रत्येक हालचालीचा परिणाम सर्व राशीच्या लोकांवर पडतो. शनि सध्या कुंभ राशीत विराजमान आहे, शनि (Shani) या राशीत वर्षभर राहील. शनी कुंभ राशीत राहूनच आपली चाल बदलत राहणार आहे. 30 जून 2024 रोजी कुंभ राशीत असताना शनि आपली सरळ चाल बदलेल आणि थेट वक्री होईल. 

Continues below advertisement

शनीच्या चालीतील बदलामुळे शुभ योगायोग तयार होत आहेत. या योगाच्या निर्मितीमुळे, काही राशींचं भाग्य उजळणार आहे. ज्योतिषशास्त्रात शनिदेवाला विशेष स्थान आहे. सध्या शनिदेव कुंभ राशीत विराजमान असून तो सरळ चाल चालत आहे, परंतु जूनमध्ये तू उलटी चाल चालेल. काही राशीच्या लोकांना शनीच्या या हालचालीचा भरपूर फायदा होईल. कोणत्या राशींचं नशीब या काळात फळफळणार? जाणून घेऊया.

मेष रास (Aries)

शनीच्या उलट्या चालीमुळे मेष राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती मजबूत राहील. या काळात मेष राशीचे लोक वादविवादापासून दूर राहतील. यश मिळवण्यासाठी मात्र तुम्हाला अधिक मेहनत करावी लागेल. तुम्ही नवीन वाहन किंवा घर खरेदी करू शकता. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवण्याची संधी मिळेल. कौटुंबिक जीवनात तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो. आरोग्याची विशेष काळजी घेण्याची गरज आहे.

Continues below advertisement

मिथुन रास (Gemini)

या राशीचे लोक शत्रूंवर विजय मिळवतील. तुम्हाला धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. शिक्षण क्षेत्राशी निगडित लोकांसाठी हा काळ वरदानापेक्षा कमी नाही. मिथुन राशीच्या लोकांना त्यांच्या करिअरमध्ये फायदा होईल. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून सहकार्य मिळेल. या काळात पैसा हुशारीने खर्च करा.

तूळ रास (Libra)

शनि तूळ राशीच्या लोकांना अनुकूल परिणाम देईल. या वर्षी शनीच्या कृपेने तुम्ही केलेल्या बहुतेक कामांमध्ये तुम्हाला यश मिळेल. व्यापारी आपल्या कामात चांगली कामगिरी करतील, करार अंतिम करण्यासाठी परदेशात जाण्याची संधी मिळू शकते. शनीच्या कृपेने धन आणि प्रतिष्ठा प्राप्त होईल. तुळ राशीच्या लोकांना शनीच्या चालीमुळे खूप फायदा होईल. व्यवसाय आणि नोकरी दोन्हीमध्ये चांगली कामगिरी कराल.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Shani : शनि 17 मार्चपर्यंत राहणार अस्त स्थितीत; दरम्यान 'या' 3 राशींना बसणार फटका, प्रत्येक कामात येणार अडथळा