Investment Plans: भविष्यात येणाऱ्या अडचणींचा सामना करण्यासाठी आत्तापासूनच गुंतवणूक (Investment) करणं महत्वाचं आहे. गुंतवणूक करताना नागरिक दोन गोष्टींचा विचार करतात, एक म्हणजे आपली ठेव सुरक्षीत राहावी आणि दुसरं म्हणजे आपल्या ठेवीवर परतावा किती मिळतो, याचा विचार केला जातो. दरम्यान, तुम्हाला कमी पगार असूनही तरी तुम्ही योग्य ठिकाणी गुंतवणूक करुन करोडो रुपये कसे मिळवू शकता. नेमकी किती आणि कुठं गुंतवणूक करावी यासंदर्भातील माहिती आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 


सध्या भारतात अनेक ठिकाणी नोकरकपात केली जात आहे. तर काही ठिकाणी अत्यातं कमी पगारातही लोक काम करत आहेत. अशा स्थितीत जर तुमचा पगारही कमी असेल आणि तुम्हाला काही गुंतवणूक करायची असेल तर चांगला मार्ग कोणता? असा प्रश्न तुमच्या मनात पडला असलेच. तर याचसंदर्भात आज आम्ही तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहोत. आज आम्ही तुम्हाला 20 हजार रुपये मासिक पगार असलेल्या व्यक्तीसाठी गुंतवणुकीच्या संदर्भात सविस्तर माहिती सांगणार आहोत. या माध्यमातून तुम्ही 1 कोटी रुपयांचा निधी तयार करू शकता. विशेष म्हणजे त्याला कोणत्याही पेन्शन फंडातही गुंतवणूक करावी लागत नाही.


कसा तयार कराल फंड? 


अलीकडच्या काळात भारतीय लोकांमध्ये म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याची सवय वाढत आहे. जर तुम्हालाही या फंडांमध्ये गुंतवणूक करायची असेल तर Lumpsum आणि SIP हे दोन मुख्य गुंतवणूक पर्याय आहेत. Lumpsum मध्ये एकरकमी पैसे गुंतवले जातात, तर SIP मध्ये, गुंतवणूक मासिक आधारावर केली जाते. आत्तापर्यंतच्या आकडेवारीवर नजर टाकली तर म्युच्युअल फंडवर सरासरी 12 ते 15 टक्के परतावा मिळतो. यानुसार तुमचा पगार 20 हजार रुपये असेल तर तुम्ही मासिक 4000 रुपयांची गुंतवणूक करू शकता.


किती दिवसात किती परतावा मिळेल?


जर तुम्ही मासिक 4,000 रुपये गुंतवल्यास आणि सरासरी 15 टक्के परतावा मिळत असेल, तर तुम्ही पुढील 25 वर्षांत 1,31,36,295 (रु. 1.3 कोटी) चा निधी तयार करु शकता. गुंतवणूक सुरू करणाऱ्या व्यक्तीचे वय 25 ते 35 दरम्यान आहे असे गृहीत धरुन ही आकडेवारी देण्यात आली आहे. सामान्यतः लोक निवृत्तीसाठी 50-60 वर्षे वयाची निवड करतात. जर तुम्हाला आधी निवृत्ती घ्यायची असेल, तर तुम्हाला त्यानुसार तुमच्या गुंतवणुकीचे नियोजन करावे लागेल. यासाठी तुम्ही आर्थिक तज्ञाचा सल्ला घेऊ शकता. त्वरीत निधी मिळविण्यासाठी तुमचे उत्पन्नाचे स्रोत वाढवण्याचे मार्ग आणि ते पैसे योग्य ठिकाणी कसे वापरावेत हे देखील तुम्ही जाणून घेऊ शकता. दरम्यान, महिना जर तुम्ही चार हजार रुपयांची गुंतवणूक केली तर 25 वर्षांपेक्षा कमी कालावधीत तुम्ही 1 कोटी रुपयांचे मालक होऊ शकता.


(टीप : कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी आर्थिक तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)


महत्वाच्या बातम्या:


LIC चा पराक्रम, एकाच दिवसात 35 हजार कोटी रुपयांचा विक्रमी फायदा