Investment Plan News : अलीकडच्या काळात गुंतवणुकीचं (Investment) महत्व मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. भविष्यातील अडचणींचा सामना करण्यासाठी आत्तापसूनच गुंतवणूक करणं गरजेचं आहे. प्रत्येकाला निवृत्तीनंतर काही तरी शिल्लक रक्कम आपल्याजवळ असावी असं वाटतं. त्यासाठी गुंतवणूक महत्वाची आहे. दरम्यान, तुम्हाला जर कमी काळात चांगला नफा किंवा करोडपती व्हायचं असेल तर तुम्हाला 15x15x15 हा गुंतवणुकीचा नियम अवलंबवा लागेल. या माध्यमातून तुम्ही करोडपती होऊ शकता. 


योग्य ठिकाणी आपल्या पैशांची गुंतवणूक केल्यास चांगला नफा मिळतो. तुम्हाला मिळणारा पैसा कमी असताना देखील तुम्ही करोडपती होऊ शकता. फक्त तुमच्याकडे येणाऱ्या पैशांचं तुम्हाला योग्य नियोजन करता आलं पाहिजे. यासाठी तुम्ही 15x15x15 हा गुंतवणुकीचा फॉर्म्युला वापरा. तुम्हाला आता 15x15x15 फॉर्म्युला म्हणजे नेमकं काय असा प्रश्न पडला असेल. तर 15 वर्षांचा कालावधी, 15,000 रुपयांची एसआयपी आणि 15 टक्के वार्षिक परतावा या आधारावर जर तुमची गुंतवणूक असेल तर तुम्ही करोडपती होऊ शकता. 


 गुंतवणुकीसाठी 15 वर्षे हा आदर्श कालावधी 


कोणत्याही गुंतवणुकीसाठी 15 वर्षे हा आदर्श कालावधी असतो. या काळात तुम्हाला चक्रवाढ व्याजाचा पूर्ण लाभ मिळतो. बाजारातील परिस्थिती आणि तुम्ही निवडलेल्या म्युच्युअल फंडानुसार परतावा देखील बदलू शकतो.


एका वर्षात 1.8 लाख रुपयांची गुंतवणूक


तुम्ही दरमहा 15 हजार रुपयांची एसआयपी करत असाल तर याचा अर्थ तुम्ही वर्षभरात 1.8  लाख रुपयांची गुंतवणूक करता. अशा प्रकारे तुम्ही 15 वर्षात एकूण 27 लाख रुपये जमा कराल. जर तुम्हाला त्यावर 15 टक्के वार्षिक परतावा मिळत असेल तर 15 वर्षांनंतर तुमचे 27 लाख रुपये 1 कोटींपेक्षा जास्त होतील. कोणत्याही गुंतवणुकीसाठी आदर्श कालावधी हा 15 वर्षांचा असतो. ज्या दरम्यान तुम्हाला चक्रवाढ व्याजाचा पूर्ण लाभ मिळतो. बाजारातील परिस्थिती आणि तुम्ही निवडलेल्या म्युच्युअल फंडानुसार परतावा देखील बदलू शकतो.


परताव्यावर परिणाम करणारे घटक कोणते? 


शेअर बाजारातील चढउतारांचा परिणाम तुमच्या म्युच्युअल फंडाच्या परताव्यावरही होतो. तुम्ही कोणत्या म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता त्याचाही परिणाम होतो. वेगवेगळे फंड वेगवेगळ्या मालमत्तांमध्ये पैसे गुंतवतात आणि त्यांची जोखीमही बदलते. यामुळे मिळालेले परतावेही वेगळे असू शकतात. असे मानले जाते की तुम्ही जितकी जास्त गुंतवणूक करता तितके चांगले परतावे मिळतात.


गरजेनुसार गुंतवणूक करा


तुम्ही तुमचे गुंतवणुकीचे लक्ष्य आणि वेळ मर्यादा लक्षात घेऊन गुंतवणूक करु शकता. उदाहरणार्थ, जर तुमचे दीर्घकालीन लक्ष्य असतील तर तुम्ही तुमच्या पोर्टफोलिओमध्ये अधिक स्टॉक ठेवू शकता. परंतू, नजीकच्या भविष्यात तुम्हाला पैशांची गरज असल्यास तुम्ही बाँडवर लक्ष केंद्रित करु शकता. तुम्ही तुमचे पैसे कुठे गुंतवता ते तुमच्या गरजांवर अवलंबून असते. समजा तुम्ही निवृत्तीसाठी बचत करत असाल, तर तुम्ही तुमच्या पैशाचा मोठा भाग स्टॉकमध्ये गुंतवू शकता. दीर्घकाळात स्टॉकमधून चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे. पण जर तुम्ही तुमचे पैसे बाँडमध्ये गुंतवले तर तुम्हाला कमी परतावा मिळेल पण पैसे सुरक्षित राहतील.


महत्वाच्या बातम्या:


सोमवारी होणार पैशांची बरसात? 'हे' चार पेनी स्टॉक देऊ शकतात दमदार रिटर्न्स!