Investment Plan : SIP म्हणजेच सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन हा आजच्या काळात गुंतवणुकीसाठी (Investment) एक चांगला पर्याय मानला जातो. म्युच्युअल फंडात SIP द्वारे गुंतवणूक केली जाते. बाजाराशी जोडलेले असूनही, SIP ही गुंतवणूक स्टॉकमध्ये (Stock) थेट पैसे गुंतवण्यापेक्षा कमी जोखमीची गुंतवणूक मानली जाते. यामध्ये किती परतावा मिळेल याची शाश्वती नसली तरी एसआयपी सरासरी 12 टक्के परतावा देईल, जे इतर कोणत्याही योजनांपेक्षा खूप जास्त आहे, असे वित्तीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे. याशिवाय, चक्रवाढीमुळं एसआयपीचे (SIP) पैसे वेगाने वाढतात.


आजच्या काळात, चांगला परतावा मिळवण्याच्या दृष्टीने ही एक अतिशय चांगली योजना आहे. विशेष गोष्ट अशी आहे की तुम्ही या योजनेत फक्त 500 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकता आणि तुमच्या उत्पन्नानुसार ही गुंतवणूक कधीही वाढवू किंवा कमी करू शकता. SIP बाबत, तज्ञांचे असे मत आहे की जर तुम्ही यामध्ये दीर्घकाळ गुंतवणूक केली आणि उत्पन्नानुसार वेळोवेळी थोडी गुंतवणूक वाढवत राहिल्यास तुम्हाला चांगला नफा मिळू शकतो. आम्ही तुम्हाला सांगतो की तुम्ही मासिक फक्त 1000 रुपये गुंतवले तरीही तुम्ही 35 लाख रुपयांपेक्षा जास्त निधी मिळवू शकता.


जाणून घ्या 35 लाखांपेक्षा जास्त रक्कम कशी मिळेल


समजा तुम्ही SIP मध्ये महिन्याला 1000 रुपयांची गुंतवणूक सुरू केली, तर तुम्ही एका वर्षात 12,000 ची गुंतवणूक कराल. तुम्हाला ही गुंतवणूक 30 वर्षे सतत चालू ठेवावी लागेल. अशा प्रकारे तुम्ही 30 वर्षांत एकूण 3,60,000 रुपये गुंतवाल. जर यावर सरासरी 12 टक्के व्याज आकारले जाते, तर 3,60,000 रुपयांच्या गुंतवणुकीवर तुम्हाला केवळ व्याज म्हणून 31,69,914 रुपये मिळतील.


 गुंतवलेल्या रकमेच्या 10 पट परतावा


अशा प्रकारे, 30 वर्षांनंतर मॅच्युरिटीवर, तुम्हाला एकूण 35,69,914 रुपये मिळतील, जे गुंतवलेल्या रकमेच्या 10 पट जास्त आहे. ही गणना सरासरी 12 टक्के व्याजाच्या आधारे करण्यात आली आहे. यापेक्षा व्याज चांगले असेल तर रक्कम आणखी वाढू शकते. जर तुम्ही या 30 वर्षांमध्ये गुंतवणुकीची रक्कम दरवर्षी 5 टक्क्यांनी वाढवली तर तुम्ही 30 वर्षात एकूण 7,97,266 रुपये गुंतवाल आणि 30 वर्षांनंतर 12 टक्के दराने तुम्ही 52 लाख 73,406  रुपये मिळवू शकता. 


महत्त्वाच्या बातम्या:


गुंतवणुकदारांसाठी SBI ची खास योजना, 5 लाखांच्या ठेवीवर 1, 2, 3 वर्षात किती मिळणार लाभ?