Inflation : पाकिस्तानातील (Pakistan) महागाईच्या बातम्या काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात फिरत होत्या. आताही तिथली परिस्थिती फारशी सुधारलेली नाही. सध्या जगातील अनेक देश महागाईचा सामना करत आहेत. काही ठिकाणी महागाईने आतापर्यंत विक्रमी पातळी गाठली आहे. लोकांना दैनंदिन वस्तू खरेदी करणे देखील कठीण झाले आहे. सध्या इराणची (Iran) स्थिती अतिशय भयंकर आहे. त्या ठिकाणचे लोक आपल्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी बाळाचे किडणी आणि यकृतही विकायला तयार झाले आहेत. याबाबतचे पोस्टर अनेक ठिकाणी लावण्यात आले आहेत.


इराणच्या काही शहरांमध्ये अवयव विक्रीसंदर्भात अनेक पोस्टर


इराणमध्ये सध्या मोठं आर्थिक संकट आल आहे. यामुळं अनेक लोकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. ज्याचा एक परिणाम म्हणजे काही लोक पैशासाठी त्यांच्या शरीराचे अवयव विकण्यास तयार झाले आहेत. इन्स्टाग्रामवर अशा अनेक पोस्ट पाहायला मिळत आहेत, ज्यामध्ये इराणी लोक त्यांची किडनी, यकृत आणि शरीराचे इतर अवयव विकण्यास तयार आहेत. द नॅशनलच्या वृत्तानुसार, इराणच्या काही शहरांमध्ये असे अनेक पोस्टर लावण्यात आले आहेत, ज्यामध्ये रक्तगट, वय आणि फोन नंबरची माहिती देण्यात आली आहे, जेणेकरून गरजू लोक थेट संपर्क करू शकतील. इराणची राजधानी तेहरानमध्येही असेच पोस्टर्स पाहायला मिळाले आहेत. शहरातील वलीसरा चौकात किडनी आणि यकृत विक्रीच्या जाहिराती पाहायला मिळतात.


महागाईची नेमकी स्थिती काय?


डिसेंबरमध्ये प्रसिद्ध झालेल्या वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्सच्या महागाई दर अहवालानुसार, इराणमध्ये चलनवाढीचा दर सध्या 39.2 टक्के आहे. जे पाकिस्तानच्या 29.2 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. इराण फोकसच्या मते, इराणच्या सेंट्रल बँकेने ऑक्टोबर 2023 मध्ये 54.8 टक्के इतका महागाई दर नोंदवला होता. जो 22 महिन्यांतील सर्वोच्च आहे. 2024 मध्येही इराणमधील चलनवाढीचा दर 30 टक्क्यांच्या आसपास राहील, अशी IMF ला अपेक्षा आहे.


इरणाचे चलन जगातील सर्वात कमकुवत चलनांपैकी एक


इरणाचे चलन हे सध्या डॉलरच्या तुलनेत जगातील सर्वात कमकुवत चलनांपैकी एक आहे. सध्या, 42,275 इराणी रियाल 1 डॉलरसाठी उपलब्ध आहेत. NBT च्या अहवालानुसार, 2022 मध्ये इराणी रियाल हे जगातील सर्वात कमकुवत चलन मानले गेले.


इराणमध्ये का आलं आर्थिक संकट?


अमेरिकेने लादलेल्या निर्बंधांमुळे इराणच्या आर्थिक परिस्थितीत अनेक संकटे आली आहेत. या निर्बंधांचा व्यापार आणि आर्थिक संबंधांवर मोठा परिणाम होत आहे. त्यामुळं अनेक देश इराणसोबत व्यापार करू शकत नाहीत. तसेच इराणला राजकीयदृष्ट्या कमकुवत करण्याचे काम केले आहे. इतकंच नाही तर इराणही यावेळी गाझाला पाठिंबा देत असल्यामुळं त्याला युद्धाचा खर्च उचलावा लागत आहे.


महत्त्वाच्या बातम्या:


पाकिस्तानात अन्न मिळणंही कठीण, महागाईनं मोडले सर्व विक्रम; महागाई दर 40 टक्क्यांवर