Paisa Jhala Motha : "बॅंकांचे व्याजदर कमी झाल्यामुळे मुदत ठेव योजनांकडे गुंतवणूकदारांचा कल वाढला आहे. याबरोबरच नवीन आयपीओकडेही गुंतवणूकदारांचा कल वाढला आहे. प्रतिक्षेत असलेल्या एलआयसीच्या आयपीओकडून गुंतवणूकदारांना चांगल्या अपेक्षा आहेत. या आयपीओतून चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे. याबरोबरच योग्य पद्धतीने गुंतवणूक केली तर येणारं आर्थिक वर्षं सकारात्मक आहे, अशी माहिती गुंतवणूक सल्लागार निखिल नाईक ( Nikhil Naik) यांनी एबीपी माझाच्या (Abp Majha) 'पैसा झाला मोठा' (Paisa Jhala Motha) या कार्यक्रमात दिली.


गेल्या 40 दिवसांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. त्यामुळे जगभरात महागाई वाढत आहे. याचा शेअर बाजारावरही परिणाम होत आहे. त्यामुळे एबीपी माझाच्या 'पैसा झाला मोठा' या कार्यक्रमात 'नवं आर्थिक वर्ष गुंतवणूकदारांसाठी कसं असेल?' या विषयावर निखिल नाईक यांनी संवाद साधला.  


गुंतवणूकदारांचा  2021-22 मध्ये शेअरबाजराकडे कल वाढला आहे. रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू झाल्यानंतर पहिले थोडे दिवस शेअर बाजार कोसळला. परंतु, हे युद्ध दोन्ही देशांपूरतेच मर्यादित राहणार असल्याचे लक्षात आल्यानंतर शेअर बाजारत सावरला आहे. चार कोटींच्या असपास शेअर बाजारात नवीन खाती तयार झाली आहेत. परंतु, या नवीन खातेधारकांना तेवढा परतावा नाही मिळालां तर हे खातेदार निराश होऊन आपले खाते बंद करू शकतात. मात्र, शेअर बाजारात टिकून राहण्यासाठी आणि योग्य परतावा मिळण्यासाठी नवीन खातेधारकांनी संयम बाळगला पाहिजे, अशी माहिती निखिल नाईक यांनी दिली आहे. 


"गेल्या एक-दोन वर्षांपासून एसआयपीमध्ये गुंतवणूक वाढली आहे. ही चांगली गोष्ट आहे. परंतु, एसआयपीमधून चांगला परतावा मिळवायचा असेल तर कालावधी जास्त ठेवला पाहिजे, असे निखिल नाईक यांनी सांगतले.   


 महत्वाच्या बातम्या