Women’s Day : आज 8 मार्च आहे. हा दिवस जगभर आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा केला जातो. महिलांना सक्षम करण्याचा आणि त्यांच्या हक्कांबद्दल जागरुकता वाढवण्याचा हा दिवस आहे. दरम्यान, प्रत्येक महिलांना आर्थिक स्वातंत्र्य हे महिलांच्या स्वावलंबी होण्याच्या दिशेने टाकलेलं एक मोठे पाऊल आहे. महिलांसाठी गुंतवणुकीचे कोणकोणते मार्ग आहेत, जाणून घेऊयात याबाबतची माहिती.
गुंतवणूक कधीपासून सुरु करावी?
तुम्ही जितक्या लवकर गुंतवणूक सुरू कराल तितके चांगले. चक्रवाढीचा पुरेपूर फायदा घेण्यासाठी लहानपणापासूनच आर्थिक नियोजन केले पाहिजे.
मुलींसाठी सर्वोत्तम गुंतवणूक पर्याय कोणते?
0-10 वर्षे पालक मुलांसाठी सुकन्या समृद्धी योजना (SSY) हा चांगला पर्याय आहे. त्याचबरोबर म्युच्युअल फंड SIP, विशेष चिल्ड्रन फंड आणि मायनर डिमॅट खाते देखील उघडू शकता.
10 ते 20 वर्षे
या वयात पालक मुलांना बचतीची सवय लावू शकतात. 1,000 ची SIP 10 टक्के स्टेप-अपसह गुंतवल्यास 40 वर्षांत सुमारे 4 कोटी रुपयांचा निधी तयार होऊ शकतो.
20 ते 30 वयोगटातील महिलांसाठी धोरण
या वयात तुम्ही कमाई सुरू करताच, खर्च करण्यापूर्वी गुंतवणूक करण्याची सवय लावली पाहिजे. घर खरेदी, लग्न, प्रवास इत्यादी मोठ्या योजनांसाठी नियोजन करा. एसआयपी, स्टॉक आणि म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणे हा एक चांगला पर्याय असू शकतो.
30 ते 40 वयोगटातील महिलांसाठी गुंतवणूक धोरण
या वयात अल्प, मध्यम आणि दीर्घकालीन उद्दिष्टे ठरवली पाहिजेत. लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅप, फ्लेक्सी कॅप फंडांमध्ये वैविध्यपूर्ण पोर्टफोलिओ तयार करणे आवश्यक आहे.
40 वर्षांनंतर आर्थिक नियोजन
या वयात आपत्कालीन निधी तयार करणे, कर्ज कमी करणे आणि सेवानिवृत्तीचे नियोजन याकडे लक्ष दिले पाहिजे. गुंतवणूक हळूहळू डेट फंड आणि सुरक्षित गुंतवणूक पर्यायांकडे वळली पाहिजे.
महिलांसाठी शेअर बाजारात गुंतवणूक
महिलांनी शेअर्समध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी ताळेबंद समजून घेण्याची सवय लावावी. पुरेसा वेळ नसेल तर आर्थिक सल्लागाराची मदत घ्यावी.
घरातील बचतीचा योग्य वापर
महिला घरबसल्या केलेल्या बचतीची गुंतवणूक पोस्ट ऑफिस स्कीम, सोने आणि म्युच्युअल फंडात करू शकतात. सोने 10 ते 15 टक्क्यांपर्यंत मर्यादित असावे आणि उर्वरित आर्थिक मालमत्तेत गुंतवावे. योग्य धोरण अवलंबल्यास महिला आर्थिक स्वावलंबन मिळवू शकतात आणि त्यांची स्वप्ने साकार करू शकतात.
महत्वाच्या बातम्या: