Interest Rate: RBI ने आपल्या व्याजदरात (Interest) कोणतेही बदल केले  नाहीत. मात्र, सरकार जानेवारी ते मार्च 2024 साठी पीपीएफ, एनएससी इत्यादी छोट्या बचत योजनांवरील व्याजदरात वाढ करण्याचा विचार करत आहे. तज्ज्ञांच्या मते, सरकारी रोख्यांच्या उत्पन्नाचा कल लक्षात घेता, लहान बचत योजनांवरील व्याजदरात वाढ होण्याची शक्यता आहे. 


चालू ऑक्टोबर ते डिसेंबर 2023 तिमाहीसाठी, सरकारने PPF, सुकन्या समृद्धी, ज्येष्ठ नागरिक बचत योजना आणि पोस्ट ऑफिस FD सारख्या लहान बचत योजनांच्या व्याजदरांमध्ये कोणताही बदल केले नाहीत. केवळ 5 वर्षांच्या आरडीमध्ये 0.20 टक्के वाढ करण्यात आली  आहे. त्याचा व्याजदर हा 6.7 टक्के करण्यात आला आहे. पीपीएफ, एनएससी इत्यादी लहान बचत योजनांवरील व्याजदर आता बाजाराशी निगडीत आहेत. त्यामुळं या योजनांवरील व्याजदर वाढण्याची शक्यता असल्याचं मत अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. 


लहान बचत योजनांच्या व्याजदरांवर निर्णय घेण्यापूर्वी सरकार देशाच्या तरलता आणि चलनवाढीवरही लक्ष ठेवते. PPF, NSC आणि KVP सह लहान बचत योजनांवरील व्याजदरांचे दर तिमाहीत पुनरावलोकन केले जाते. सध्या लहान बचत योजनांवर 4 टक्के (पोस्ट ऑफिस सेव्हिंग डिपॉझिट) आणि 8.2 टक्के (ज्येष्ठ नागरिक बचत योजना) व्याजदर आहेत.


कोणत्या ठेवीवर किती व्याजदर?


बचत ठेव - 4 टक्के
1 वर्षाची FD - 6.9 टक्के
2 वर्षांची FD - 7 टक्के
3 वर्षांची FD - 7 टक्के
5 वर्षांची FD - 7.5 टक्के
5 वर्ष आवर्ती ठेव -  6.7 टक्के
राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC) - 7.7 टक्के
किसान विकास पत्र - 7.5 
सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी - 7.1 टक्के
सुकन्या समृद्धी खाते - 8 टक्के
ज्येष्ठ नागरिक बचत योजना - 8.2 टक्के
मासिक उत्पन्न योजना - 7.4 टक्के


अल्पबचत योजना तीन श्रेणींमध्ये समाविष्ट 


स्मॉल सेव्हिंग स्कीममध्ये बचत ठेव, सार्वजनिक सुरक्षा योजना आणि मासिक उत्पन्न योजना या 3 श्रेणींचा समावेश आहे. बचत ठेवींमध्ये 1-3-वर्षांची FD आणि 5-वर्षांची RD समाविष्ट असते. यामध्ये राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC) आणि किसान विकास पत्र (KVP) सारख्या बचत प्रमाणपत्रांचा देखील समावेश आहे. सार्वजनिक सुरक्षा योजनांमध्ये PPF, सुकन्या समृद्धी खाते आणि ज्येष्ठ नागरिक बचत योजना यांचा समावेश होतो. मासिक उत्पन्न योजनेमध्ये मासिक उत्पन्न खाते समाविष्ट आहे. चालू ऑक्टोबर-डिसेंबर 2023 तिमाहीसाठी, सरकारने PPF, सुकन्या समृद्धी, ज्येष्ठ नागरिक बचत योजना आणि पोस्ट ऑफिस FD सारख्या लहान बचत योजनांच्या व्याजदरांमध्ये कोणताही बदल केलेला नाही. केवळ 5 वर्षांच्या आरडीमध्ये 0.20 टक्के वाढ करण्यात आली आणि व्याजदर 6.7 टक्के करण्यात आला.


महत्त्वाच्या बातम्या:


10 लाख गुंतवा 20 लाख मिळवा; SBI ची जबरदस्त योजना