Infosys CEO Salil Parekh Salary : इन्फोसिसचे मुख्य कार्यकारी अधिकारी सीईओ (CEO) आणि व्यवस्थापकीय संचालक (MD) सलील पारेख (Salil Parekh) यांची एकूण भरपाई गेल्या आर्थिक वर्षात 43 टक्क्यांनी वाढून 71.02 कोटी रुपये प्रतिवर्ष झाली आहे. Infosys CEO यांना 2020-21 मध्ये एकूण 49.68 कोटी रुपये आणि 2019-20 मध्ये 34.27 कोटी रुपये मिळाले होते.
वार्षिक अहवालानुसार, 2021-22 मध्ये सलील पारेख यांच्या नुकसान भरपाईमध्ये 5.69 कोटी मूळ पगार, 0.38 कोटी सेवानिवृत्ती लाभ,12.62 कोटी बोनस आणि प्रोत्साहने आणि 52.33 कोटी समभाग पर्यायांचा समावेश आहे. Infosys CEO ने 2015 स्टॉक ऑप्शन प्लॅन अंतर्गत 2,29,792 स्टॉक युनिट्स आणि 2019 च्या प्लॅन अंतर्गत 1,48,434 युनिट्सचा वापर गेल्या आर्थिक वर्षात केला.
राजेश गोपीनाथन, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि भारतातील सर्वात मोठी माहिती तंत्रज्ञान किंवा IT सेवा फर्म टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे व्यवस्थापकीय संचालक, यांनी 2021-22 मध्ये 25.76 कोटी रुपयांचे वेतन पॅकेज काढले आहे.
सलील पारेख यांच्या नेतृत्वाखाली इन्फोसिसची असाधारण कामगिरी
सलील पारेख यांची नुकतीच 1 जुलै 2022 ते 31 मार्च 2027 या पाच वर्षांच्या कालावधीसाठी कंपनीचे सीईओ आणि एमडी म्हणून दुसऱ्यांदा नियुक्ती करण्यात आली आहे.
सलील पारेख यांच्या इन्फोसिसमधील उल्लेखनीय प्रवासाबद्दल आणि कंपनीच्या वाढीबद्दल, इन्फोसिसचे अध्यक्ष नंदन एम. नीलेकणी म्हणाले, “आमचे सीईओ, सलील पारेख यांनी इन्फोसिसच्या सर्व क्षमता एकत्र आणल्या आहेत. सलीलने कंपनीसाठी उद्योगातील अग्रगण्य कामगिरी केली आहे."
महत्वाच्या बातम्या :