GST Rates: जीएसटीच्या दरांबाबत गेल्या काही दिवसांपासून चर्चा आहे की, सरकार त्याचा स्लॅब बदलू शकते. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सध्याची परिस्थिती पाहता वस्तू आणि सेवांवरील जीएसटी दर तर्कसंगत करण्याची शक्यता सध्या कमी आहे.
टॅक्स स्लॅब कमी करण्याचा विचार
सध्या सरकार वस्तू आणि सेवांवर जीएसटी अंतर्गत 5 टक्के, 12 टक्के, 18 टक्के आणि 28 टक्के दराने कर आकारते. हे टॅक्स स्लॅब तीनपर्यंत कमी करण्याचा विचार केला जात असल्याचे वृत्त आहे.
किती आकाराला जातो टॅक्स?
सरकारकडून करण्यात येत असलेल्या नवीन दुरुस्तीनुसार काही वस्तूंवरील कर वाढवण्यात येणार आहे. तर काही वस्तू आणि सेवांवरील करातही कपात केली जाऊ शकते. याशिवाय सोने आणि सोन्याच्या दागिन्यांवर तीन टक्के दराने कर आकारला जातो.
रशिया-युक्रेन युद्धाचाही परिणाम
सध्या महागाईचा दर कायम असल्याचे सूत्रांनी सांगितले. अशातच जीएसटी दर तर्कसंगत करण्यास फारसी शक्यता नाही. कोविड महामारीच्या प्रभावातून अर्थव्यवस्था सावरत होती, परंतु यावर्षी रशिया-युक्रेन युद्धाचा फटका अर्थव्यवस्थेला बसला आहे.
28% कर देखील आकारला जातो
जीएसटी अंतर्गत, जीवनावश्यक वस्तूंना एकतर सूट दिली जाते किंवा कमी दराने कर आकारला जातो. तर आरामदायी वस्तूंवर 28 टक्के जास्त दराने कर आकारला जातो. यासोबतच अशा वस्तूंवर उपकरही लावला जातो. जीएसटी लागू झाल्यामुळे होणाऱ्या संभाव्य महसुलाच्या नुकसानीची भरपाई करण्यासाठी उपकर आकारला जातो.
समिती स्थापन करण्यात आली
GST कौन्सिलने गेल्या वर्षी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली होती. ज्यात कर दर तर्कसंगत करून आणि कर दरांमधील विसंगती दूर करून महसूल वाढवण्याचे मार्ग सुचवले होते.
इतर महत्वाच्या बातम्या:
Bank Privatisation: 'या' 2 सरकारी बँकांचे लवकरच होणार खासगीकरण; आताच तपासा तुमचेही आहे का खाते?
FY2021-22 मध्ये आर्थिक विकासदर 9.2 टक्के राहू शकतो, या अहवालात करण्यात आला दावा