नवी दिल्ली: देशातील महागाईचा परिणाम आता दुधाच्या दरावरही दिसून येणार आहे. डेअरी कंपन्या लवकरच दुधाचे दर वाढवू शकतात असे संकेत मिळत आहेत. अलीकडे जागतिक स्तरावर स्किम्ड मिल्क पावडर तसेच पशुखाद्याचे दर वाढले आहेत. यामुळेच चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत किंमती वाढू शकतात असं आयसीआयसीआय सिक्युरिटीजच्या तज्ज्ञांनी सांगितलं आहे. 


सर्व डेअरी कंपन्या किंमती 5 टक्के ते 8 टक्क्यांपर्यंत दर वाढवू शकतात. दुधाचे वाढते दर हा चिंतेचा विषय आहे. सर्व डेअरी कंपन्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत किमती वाढवतील असं जाणकारांनी म्हटलं आहे. दुधाचे पदार्थ वाढल्याने स्वाभाविक दुग्धजन्य पदार्थ महाग होऊ शकतात. 


कमी उत्पादन आणि वाढीव खर्चाचे कारण
गेल्या काही वर्षांत घरांसोबतच हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स सारख्या गोष्टी मोठ्या प्रमाणात नव्याने वाढल्याने दुधाची मागणी झपाट्याने वाढली आहे. त्यामुळे दुधाचे दर वाढले आहेत. जनावरांच्या चाऱ्याच्या किमतीत झालेली वाढ आणि उष्णतेमुळे दूध उत्पादनात झालेली घट याचाही भावावर परिणाम झाल्याचे विश्लेषकांनी सांगितलं आहे. परिणामी घाऊक दुधाचे दर वर्षानुवर्षे वाढतच आहेत. उदाहरणार्थ, अखिल भारतीय पातळीवर जूनमध्ये घाऊक दुधाच्या किमती 5.8 टक्क्यांनी वाढल्या होत्या. दक्षिण भारतात दुधाचे दर वर्षाला 3.4 टक्के वाढले आहेत.


निर्यात वाढल्याने दूध महाग 
दैनंदिन वस्तूंच्या किमती वाढल्याने जनतेला महागाईचा सामना करावा लागतो आहे. कंपन्यांना कच्च्या मालाच्या वाढलेल्या किमतीचाही सामना करावा लागत आहे. उदाहरणार्थ, जागतिक स्किम्ड मिल्क पावडरच्या किमती गेल्या 12 महिन्यांत सातत्याने वाढल्या आहेत, जूनमध्ये वर्ष-दर-वर्ष 26.3 टक्के आणि महिन्या-दर-महिन्यात 3 टक्के वाढ झाली आहे. तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की आकर्षक निर्यात संधी भारतीय दूध उद्योगातील मागणी-पुरवठा समीकरण बिघडू शकतात.


महत्त्वाच्या बातम्या: