WhatsApp UPI Payment : आजकाल ऑनलाईन पेमेंटचं प्रमाण वाढलं आहे. सध्या लोक रोख पैसे देण्याएवजी ऑनलाईन पेमेंटचा सोपा मार्ग निवडता. मात्र अनेक जणांना व्हॉट्सॲपद्वारे (Whatsapp) यूपीआय (UPI Payment) करता येत हे माहित नसेल. व्हॉट्सॲपचा वापर सध्या मेसेंजिग ॲप म्हणून तसेच फोटो आणि व्हिडीओ शेअरींग प्लॅटफॉर्म म्हणून अधिकच वापर केला जातो. मात्र तुम्हांला इतर UPI पेमेंट प्रमाणे व्हॉट्सॲपद्वारेही UPI पेमेंट करता येतं. व्हॉट्सॲप अद्याप UPI पेमेंट करणाऱ्या टॉप ॲप्सच्या यादीत नाहीत. त्यामुळे व्हॉट्सॲपकडून यूपीआय पेमेंट ॲपसाठी युजर्स वाढवण्याचा प्रयत्न सुरु आहे. सध्या फोनपे हे UPI Payment साठीचं पहिल्या क्रमांकाचं ॲप आहे. त्यानंतर गुगल पे, ॲमेझॉन पे, एअरटेल मनी यांसारख्या ॲपचा क्रमांक लागतो.


व्हॉट्सॲपवरून क्यूआरकोड स्कॅन करा
UPI पेमेंट प्रक्रियेअंतर्गत तुम्ही एखाद्या स्टोअरमध्ये UPI QR कोड स्कॅन करून WhatsApp द्वारे सहज पेमेंट करू शकता. युजर्स व्हॉट्सॲपवर कॅमेरा आयकॉनवर टॅप करु शकतात. कॅमेरा आयकॉनवर टॅप केल्यानंतर कॅमेरा उघडेल आणि वापरकर्ते कोणताही UPI QR कोड स्कॅन करू शकतात. पेमेंट पूर्ण होताच त्याचा मेसेज आपोआप त्याच्या व्हॉट्सॲप संपर्कावर जाईल.


पूर्णपणे सुरक्षित असेल WhatsApp UPI Payment पेमेंट 
व्हॉट्सॲपने दावा केला आहे की, WhatsApp UPI Payment हे फिटर पूर्णपणे सुरक्षित आहे आणि व्हॉट्सॲप आपल्या युजर्सच्या सुरक्षिततेबाबत कोणतीही तडजोड स्वीकारत नाही. येथे तुम्ही WhatsApp च्या माध्यमातून UPI​कोड स्कॅन करून पेमेंटची पद्धत जाणून घेऊ शकता.


प्रक्रिया जाणून घ्या



  • WhatsApp वर जा आणि कॅमेरा उघडा.

  • आता कॅमेऱ्याच्या स्कॅन आयकॉनने UPI QR कोड स्कॅन करा.

  • आता तुमचे खाते व्हॉट्सॲप नंबरशी लिंक असल्यास तुम्ही पेमेंट करू शकता.

  • खाते लिंक नसेल तर आधी लिंक करणे आवश्यक असेल.


महत्त्वाच्या इतर बातम्या