Business News : आपल्या भारत (India) देशातून दरवर्षी अनेक लोक स्थलांतर (migration) करतात. जगाच्या पाठीवर प्रत्येक देशात आपल्याला भारतीय लोक आढळतात. कोणी नोकरीसाठी (Job) जाते, कोणी व्यवसायासाठी जाते, तर कोणी शिक्षणासाठी जाते. मिळालेल्या माहितीनुसार परदेशातील भारतीयांची संख्या (Number of Indians Abroad) ही 1.8 कोटी एवढी मोठी आहे. परदेशातील असणाऱ्या भारतीयांनी एक नवीन विक्रम केला आहे. यामुळं भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेलाय. भारतातून स्थलांतर करणाऱ्यांनी भारतात सर्वात जास्त पैसे पाठवण्याचा विक्रम केला आहे. इतर देशांच्या तुलनेत भारत आघाडीवर आहे.
100 अब्ज डॉलरचा टप्पा गाठणारा भारत हा जगातील पहिलाच देश
इतर देशातून आपापल्या देशात पैसे पाठवण्याच्या यादीत भारत आघाडीवर आहे. पहिल्या दहा जणांमध्ये भारतासबत पाकिस्तान आणि बांगलादेशचाही समावेश आहे. भारताला 111 अब्ज डॉलर्स प्राप्त झाले आहेत. ही खूप मोठी रक्कम आहे. 100 अब्ज डॉलरचा टप्पा गाठणारा भारत हा जगातील पहिलाच देश ठरला आहे. इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर मायग्रेशनने जागतिक स्थलांतराबाबतचा अहवाल प्रसिद्ध केलाय. यामध्ये ही माहिती देण्यात आलीय. दरम्यान, अहवालात दिलेल्या माहितीनुसार, यूएई, अमेरिका आणि सौदी अरेबियामध्ये मोठ्या प्रमाणात भारतीय लोक राहतात. या लोकांनी मोठ्या प्रमाणात पैसा भारतात पाठवला असल्याचे अहवालात सांगण्यात आले आहे.
कोणत्या देशाला कितवा क्रमांक?
परदेशातून पैसे पाठवण्यात भारत आघाडीवर आहे. भारताचा पहिला क्रमांक लागतो. तर मेक्सिकोचा दुसरा, चीनचा तिसरा, फिलीपिन्स चौथा आणि फ्रान्सचा पाचवा क्रमांक लागतो. तर यादीत पाकिस्तान सहाव्या क्रमांकावर आहे. तर बांगलादेशचा आठवा क्रमांक लागतो. पाकिस्तान आणि बांगलादेश या दोन्ही देशातून मोठ्या प्रमाणावर स्थलांतर होते.
देशाच्या एकूण लोकसंख्या 1.3 टक्के स्थालंतर हे भारतीय लोकांचं
जगात सर्वात जास्त स्थलांतर हे भारतात होते. कारण भारताची लोकसंख्या मोठी आहे. त्यामुंळं स्थलांतर होण्याचं प्रमाण देखील जास्त आहे. दरम्यान, अहवालात दिलेल्या माहितीनुसार, देशाच्या एकूण लोकसंख्या 1.3 टक्के स्थालंतर हे भारतीय लोकांचं आहे. यूएई, अमेरिका आणि सौदी अरेबिया यासारख्या देशांमध्ये मोठ्या प्रमाणात भारतीय लोकांचं स्थलांतर झाल्याची माहिती अहवालात देण्यात आलीय. स्थलांतर जरी जास्त असलं तरी परदेशातून आपल्या देशात पैसे पाठवण्यात भारतीय लोक आघाडीवर आहेत.
महत्वाच्या बातम्या:
Exclusive : मेळघाटातील बहुतेक गावांत स्थलांतर,कुपोषणाचा प्रश्न कायम; एप्रिल ते नोव्हेंबरमध्ये उप जिल्हा रुग्णालयात 43 बालकांचा मृत्यू