Share Market News : भारतीय शेअर बाजारात आज सुरुवातीलाच थोडी घसरण असल्याचं पाहायला मिळालं. सेन्सेक्स (sensex) 750 अंकांनी कोसळला आहे तर निफ्टी (Nifti) 180 अंकांनी खाली आला आहे. परकीय निधीचे निर्गमन झाल्याने बाजारात गुंतवणूकदारांकडून (Investment) नफा वसुलीला प्राधान्य देण्यात आलं आहे. 


भारतीय शेअर बाजारात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेला घसरणीचा ट्रेंड बुधवारी (8 मे ) थोडा थांबल्याचं पाहायला मिळालं होतं. सेन्सेक्स आणि निफ्टी जवळपास सपाट बंद झाले होते. मात्र, आज पुन्हा सेन्सेक्स 750 अंकांनी कोसळला आहे तर निफ्टी 180 अंकांनी खाली आला आहे. सुरुवातीच्या व्यवहारात निफ्टी मेटल इंडेक्स, निफ्टी आयटी इंडेक्स, निफ्टी पीएसयू बँक इंडेक्स, निफ्टी बँक, निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस इंडेक्स, निफ्टी फार्मा इंडेक्स, निफ्टी रिॲल्टी इंडेक्स निफ्टी ऑटो, निफ्टी सीपीएसई इंडेक्स हिरव्या रंगात व्यवहार करताना दिसले.


महत्वाच्या बातम्या:


'या' कंपनीत पैसे गुंतवा अन् व्हा मालामाल, एका महिन्यात दिलेत तब्बल 582 टक्क्यांनी रिटर्न्स