नवी दिल्ली : भारतात सोन्याच्या दागिन्यांना अधिक महत्त्व दिलं जातं. भारतात लग्न समारंभ किंवा इतर कार्यक्रमांमध्ये महिला सोन्याच्या दागिन्यांना पहिली पसंती देतात. आपल्या देशात प्रत्येक घरातील महिलांकडे थोड्या प्रमाणात सोनं असतेच. धार्मिक कार्यक्रमांवेळी सोन्याच्या दागिन्यांचं वापर करण्यास पसंती दिली जाते. भारतातील महिलांकडे नेमकं किती सोनं आहे हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. जगभरातील कोणत्या देशातील महिलांकडे सर्वाधिक सोनं आहे. भारताचा त्या यादीत कितवा क्रमांक लागतो हे जाणून घेतलं पाहिजे.   
 


भारतामध्ये इतर देशांच्या तुलनेत सोन्याच्या दागिन्यांचा वापर अधिक केला जातो. महिलांमध्ये पुरुषांच्या तुलनेत अधिक सोन्याच्या दागिन्यांचा आवड असल्याचं पाहायला मिळतं. भारतात काही राज्यांमध्ये धार्मिक कार्यक्रमांमध्ये महिला सोन्याच्या दागिने घालतात.


भारतातील महिलांकडे किती सोनं?


जागतिक सोने परिषदेच्या एका रिपोर्टनुसार भारतातील महिलांच्या जवळ 24 हजार टन सोनं आहे. हे सर्वाधिक सोनं असल्याचं मानलं जातं. वर्ल्ड गोल्ड काऊन्सिलच्या रिपोर्टनुसार भारतातील महिलांकडे जगातील सोन्यापैकी 11 टक्के सोन्याचे दागिने आहेत. भारतातील महिला जेवढे सोनं वापरतात ते जगातील सोन्याचा वापर करणाऱ्या इतर टॉप पाच देशांच्या तुलनेत अधिक आहे.  


आपल्या देशात सर्वाधिक सोनं दक्षिण भारतातील महिला वापरतात. दक्षिण भारतात देशातील एकूण सोन्यापैकी 40 टक्के सोनं आहे. तामिळनाडू राज्यात सर्वाधिक 28 टक्के सोनं आहे. इतर राज्यांच्या तुलनेत तामिळनाडूमध्ये सोन्याचे दागिने सर्वाधिक आहेत.  


कोणत्या देशांकडे किती सोनं


अमेरिकेकडे 8 हजार टन सोनं आहे. जर्मनीकडे 3300 टन सोनं आहे. त्यानंतर इटलीजवळ 2450 टन, फ्रान्सकडे 2400 टन, रशियाकडे 1900 टन सोनं आहे. भारतानं आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये ब्रिटनमध्ये ठेवलेलं 100 टन सोनं देशात परत आणलं आहे. 1991 मध्ये भारताकडे परकीय चलन कमी असल्यानं देशातील सोनं विदेशात ठेवावं लागलं होतं.  


इतर बातम्या :


गृहलक्ष्मी योजनेचे 2 हजार आले, आख्ख्या गावाला पुरणपोळीचं जेवण, कर्नाटकातील लाडक्या बहिणीचा नाद खुळा!


जन्माष्टमीच्या मुहूर्तावर 'हे' पाच स्टॉक तुम्हाला करतील मालामाल? जाणून घ्या स्टॉप लॉस, टार्गेट काय असावं!