Indian Railway New Rules नवी दिल्ली: भारतीय रेल्वेनं तिकीट आरक्षित करण्यासंदर्भातील नियमांमध्ये बदल केला आहे. आता 120 दिवसांऐवजी 60 दिवस अगोदर तिकीट आरक्षित करता येल. रेल्वे मंत्रालयानं यासंदर्भातील एक नोटिफिकेशन जारी केलं आहे. रेल्वेच्या नोटिफिकेशननुसार आता पुढच्या दोन महिन्यांच्या काळातील तिकीट बुक करता येईल. यापूर्वी ते चार महिन्यांच्या कालावधीमधील आरक्षित करता येत होतं. यामुळं रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर मोठा परिणाम होणार आहे.
रेल्वेच्या नोटिफिकेशननुसार नवा नियम 1 नोव्हेंबर 2024 पासून लागू होणार आहे. यामध्ये आगाऊ तिकीट आरक्षणाची मर्यादा 120 दिवसांवरुन कमी करुन 60 दिवसांवर आणली गेली आहे. यामध्ये प्रवासाच्या तारखा वगळल्या जाणार आहेत. सध्याच्या नियमानुसार पुढील चार महिन्यांच्या कालावधीतील एका तारखेला तुम्हाला प्रवास करायचा असल्यास त्याचं बुकिंग करु शकता. नवीन नियम नोव्हेंबरपासून लागू होणार आहे.
या ट्रेन्सना नियम लागू नसणार
रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार तिकीट आरक्षणाचा बदलेला नियम हा ता एक्स्प्रेस, गोमती एक्स्प्रे अशा गाड्यांसाठी लागू नसेल. याशिवाय परकीय पर्यटकांना 360 दिवसांची मर्यादा आहे. त्यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
प्रवाशांची अडचण होणार?
आता प्रवाशांना 120 दिवस अगोदर तिकीट बुक करता येत होतं. त्यामुळं तिकीट बुकिंग होत असताना एखाद्याचं तिकीट वेटिंगवर असल्यास ते कन्फर्म होण्यासाठी वेळ असायचा . आता 60 दिवसांचा वेळ असल्यानं तिकीट आरक्षित करण्याऱ्यांची संख्या वाढेल. वेटिंग तिकीट कन्फर्म होण्याची शक्यता कमी आहे. पूर्वांचल आणि बिहारच्या मार्गांवर तिकीट आरक्षण चार महिने अगोदर फुल्ल झालेलं असतं.
रेल्वेकडून सातत्यानं दलालांवर कारवाई
रेल्वे तिकीट आरक्षण प्रक्रिया सोपी बनवण्यासाठी आणि सर्व प्रवाशांना तिकीट मिळवण्यासाठी रेल्वेकडून प्रयत्न केले जात आहे. अवैधरित्या तिकीट बुकिंग करण्याऱ्यांविरोधात देखील रेल्वेकडून कारवाई करण्यात येत आहे.
रेल्वे आरक्षित करण्याचे दोन पर्याय
भारतीय रेल्वेच्या आयआरसीटीसीच्या वेबसाईटवरुन तिकीट आरक्षित करता येते. यासाठी प्रवाशांना त्या वेबसाईटवर त्यांची नोंदणी करावी लागते. आयआरसीटीसीच्या वेबसाईटवर नोंदणी केल्यानंतर तिकीट बुकिंग करता येतं. Ask Disha या एआय प्लॅटफॉर्मचा वापर करुन देखील तिकीट आरक्षित करता येतं. याशिवाय रेल्वे स्टेशनवर जाऊन तिथं अर्ज भरुन देऊन रोख रक्कम भरुन तिकीट आरक्षित करता येते.
इतर बातम्या :