Gold Rate : सोन्याचे दर पुन्हा एकदा गगणाला भिडताना दिसत आहेत. दसरा सणाच्या मुहूर्तावर काहीसा दर कमी झाला होता, मात्र आता पुन्हा एकदा सोन्याचे भाव वाढले आहेत. सोन्याच्या दरात दिवसागणीक वाढ होत असल्याचं पाहायला मिळत असून आज पुन्हा एकदा सोन्याच्या दराने विक्रमी पातळी गाठली आहे. जीएसटीसह सोन्याचे दर 79450 रुपयांवर जाऊन पोहोचले आहेत.


केंद्रीय अर्थ संकल्पात सोन्याच्या करात सवलत देण्यात आल्यानंतर सोन्याच्या दरात पाच हजार रुपयांची घसरण झाल्याचं पाहायला मिळाले होतं. त्यानंतर दोन महिने पर्यंत सोन्याच्या दरात फारसे चढ उतार झाले नव्हते. मात्र आता इस्रायल आणि हमास युद्धाची तीव्रता वाढल्याचा परिणाम म्हणून गुंतवणूकदारांनी आपला मोर्चा सोन्याच्या गुंतवणुकीकडे वळवला असल्याने सोन्याच्या मागणीत वाढ होऊन सोन्याच्या दरात ही वाढ झाल्याचं दिसून येत आहे.


जळगावच्या सराफा बाजारात सोन्याच्या दरात मोठी वाढ 


गेल्या महिना भरापासून सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत असून आज जळगावच्या सुवर्ण नगरीमध्ये सोन्याच्या दराने नव्याने उच्चांकी पातळी गाठली असून जीएसटीसह सोन्याचे दर 79450 इतक्या विक्रमी पातळीवर जाऊन पोहोचले आहेत. पुढील काळात दिवाळी सारखा सण पाहता,अजूनही सोन्याचे दर वाढू शकणार असल्याचा अंदाज सोने व्यावसायिकांनी व्यक्त केला आहे.


तर देशभरातील 24 कॅरेट सोन्याचे दर  


दिल्ली -  78,050
मुंबई - 77,900
अहमदाबाद - 77,9501
कोलकाता - 77,900
लखनऊ - 78,050
बेंगलुरु - 77,900
जयपुर - 78,050
पटना - 77,950
हैदराबाद - 77,900
भुवनेश्वर- 77,900


देशभरात आज (गुरूवारी) 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति ग्रॅम 7671 रुपये आहे. 22 कॅरेट सोन्याची किंमत 7487 रुपये प्रति ग्रॅम तर 18 कॅरेट सोन्याची किंमत 6214 रुपये प्रति ग्रॅम इतकी आहे. आज देशभरात चांदीची किंमत 96,800 रुपये प्रति किलोग्राम आहे. मात्र, दिवाळी सणाआधी सोन्याचे भाव वाढतील, असे जाणकारांचे अंदाज आहेत. 




सोन्या-चांदीची किंमत जाणून घ्या एका क्लिकवर


शनिवार आणि रविवारी सोन्याचे दर जाहीर केले जात नाहीत. 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांचे किरकोळ दर जाणून घेण्यासाठी, तुम्ही 8955664433 वर मिस कॉल करू शकता. काही वेळात एसएमएसद्वारे दर उपलब्ध होतील. याशिवाय, तुम्ही सतत अपडेट्ससाठी www.ibja.co किंवा ibjarates.com तपासू शकता.