Mumbai Corona Update : मुंबईतील दैनंदिन कोरोना रुग्णांच्या संख्येत चढउतार पाहायला मिळत आहे. बीएमसीने दिलेल्या आकडेवारीनुसार, मंगळवारी मुंबईत 158 नव्या रुग्णांची भर पडली आहे. मंगळवारी पाच रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मागील 24 तासांत मुंबईत एकाही कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. मंगळवारी 122 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
बीएमसीने दिलेल्या आकडेवारीनुसार, मंगळवारी एकाही कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. तर गेल्या 24 तासात मुंबईमध्ये 122 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईमध्ये सध्या 932 सक्रिय रुग्ण आहेत. मुंबईमध्ये आतापर्यंत 10,41,348 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून बरे झालेल्या रुग्णांचे प्रमाण हे 98 टक्के इतकं आहे. तसेच मुंबईतील रुग्ण दुप्पटीचा कालावधी कालावधी 5449 झाला आहे. तसेच कोरोना वाढीचा दर 0.012% टक्के इतका आहे.
सर्वाधिक सक्रीय रुग्ण मुंबईत
राज्यात सर्वाधिक सक्रीय रुग्ण मुंबईममध्ये आहेत. मुंबईमध्ये 932 सक्रीय रुग्ण आहेत. तर पुण्यात 299 सक्रीय रुग्ण आहेत. त्यानंतर ठाण्यात 168 सक्रीय रुग्ण आहेत. अहमदनगर 21, रायगड 48, पालघर 11, नाशिक 16, नागपूर, 11, बीडमध्ये 13 सक्रीय रुग्ण आहेत. इतर ठिकाणी सक्रीय रुग्णांची संख्या 10 पेक्षा कमी आहे. राज्यात एकूण 1551 सक्रिय रुग्ण आहेत.
राज्यात आज 266 कोरोना रुग्णांची नोंद
राज्यातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत काहीसा चढ-उतार दिसून येत आहे. राज्यात आज 266 नव्या रुग्णांची भर पडली आहे तर 241 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. गेल्या 24 तासामध्ये राज्यात शून्य कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आज शून्य कोरोनाबाधित मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर हा 1.87 टक्के इतका झाला आहे. तसेच राज्यात आतापर्यंत 77,31,829 कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे 98.10 टक्के इतके झाले आहे. सध्या देशात 16 हजार 400 रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रायलाने ही माहिती दिली आहे.
संबंधित बातम्या